logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते...


श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी भूमिपूजन समारंभ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते उद्या रविवार, दिनांक 1 मार्च रोजी सायंकाळी 5.00 वाजता संपन्न होणार असल्याची माहिती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन तसेच भीमराज बागुल व सचिन ब्राह्मणे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.
या कार्यक्रमास भंते करुणानंद यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि मा.खा.भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुजयदादा विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून भीम अनुयायांचे गेल्या 50 वर्षांपासूनचे स्वप्न साकार होत असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या कामासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दीड कोटी रुपये मंजूर करून ते वर्ग देखील करण्यात आले आहे.या
पूर्णाकृती पुतळ्यास परवानगी मिळवण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारक समितीने गेली अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी कार्यालय, वन विभाग, पुराभिलेख विभाग (मुंबई), श्रीरामपूर नगरपालिका व तहसील कार्यालय येथे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विविध शासकीय अडचणी दूर करण्यात आल्या. समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जागेच्या परवानगीसाठी विशेष प्रयत्न करून प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून भीम अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राजाभाऊ कापसे, महेंद्र त्रिभुवन,नाना गायकवाड, सुनील शिरसाठ, संजय बोरगे, विशाल सुरडकर, चरण त्रिभुवन, राजू मगर, संजय रूपटक्के, दादासाहेब बनकर, रॉकी लोंढे, प्रकाश ढोकणे, अमोल काळे, सुरेश जगताप किशोर ठोकळ, मनोज काळे, मोहन आव्हाड, लक्ष्मण मोहन, अर्जुन शेजवळ, प्रदीप कदम गायकवाड, रमाताई धीवर, संतोष मोकळ, गोरख आढाव,सुमेध पडवळ संघराज त्रिभुवन तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
463 views

Comment