logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोदा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि डॉ राजेंद्र प्रसाद पुण्यतिथि

*जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोदा येथे आज दि. 28/2/26 दप्तरमुक्त शनिवार ,,,,,,,राष्ट्रीय विज्ञान दिवस* तथा *डाॅ राजेंद्रप्रसाद पुण्यथतिथी* निमित्ताने डाॅ सी व्ही रमण यांच्या भौतिक शास्त्र तत्वज्ञानाच्या पार्श्वभुमीवर *Raman Effect* चे प्रात्याक्षिक करुन विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गाजरामजी परिहार यांनी देशभक्त भगतसिंग व चंद्रशैखर आझाद यांची फोटो देतांना शाळा व विद्यार्थी तसेच शिक्षक सर्वांची प्रशंसा केली . प्रमुख पाहुणे श्री छन्नालालजी यांनी दिलेल्या डाॅ सी व्ही रमण यांच्या फोटोला पाहुन आपल्या विद्यार्थी जिवनातील क्षणांना उजाळा दिला. प्रास्ताविकाद्वारे मुख्याध्यापक श्री विनोद चन्ने यांनी शाळा व वर्तमान स्थिती वर प्रकाश टाकला तर संचलनातुन सौ सरिता पारधी मॅडम यांनी रमण इफेक्ट वर भरपुर उदाहरणांतुन माहीती दिली , कु देविता पारधी यांनी देखील विज्ञान व मानवी प्रगती यांसोबत विविध उदाहरणांद्वारे वैज्ञानिक दृष्टीकोण वाढविण्यावर भर दिला तसेच विद्यार्थ्यांनी विज्ञान दिवस व डाॅ राजेंद्र प्रसाद यांच्या वर माहीती सांगीतली तर पराग शहारे व कु शैजल बारेवार यांनी प्रात्याक्षिक व दिग्ददर्शन पध्दतीने चार प्रयोग करुन दाखविले

6
578 views

Comment