कै. वाल्हू हरिभाऊ वाळुंज पा. यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, भजन व महाप्रसाद कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न.
लोणी प्रतिनिधी: तेजस वाळुंज
शनिवार दि. २८/०२/२०२६
लोणी (बागवस्ती) येथे कै. वाल्हू हरिभाऊ वाळुंज पा. यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कुटुंबियांच्या वतीने शुक्रवार दि.२७/०२/२०२६ रोजी कीर्तन, भजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री. राहुल वाल्हू वाळुंज (मुलगा, उद्योजक), सौ. सुवर्णा राहुल वाळुंज (सून), सौ. मंगल मुक्ताराम गोपाळे (मुलगी), सौ. जयश्री अशोक काळे (मुलगी), श्री. तेजस बाळासाहेब वाळुंज (नातू, पत्रकार) व सौ. सरस्वती तेजस वाळुंज (नातसून) यांनी केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९:०० वाजता कै.वाल्हू हरिभाऊ वाळुंज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रतिमा पूजन सुनील भालेराव काका यांच्या वेद मंत्रांनी करण्यात आले.
त्यानंतर सकाळी ९:३० ते ११:३० या वेळेत ह.भ.प. सौ. सृष्टीताई कृष्णा महाराज पिंगळे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कीर्तनरूपी सेवा दिली.
आपल्या कीर्तनातून त्यांनी ‘बाप काय असतो’, बापाचे जीवनातील स्थान व महत्त्व अत्यंत भावनिक पद्धतीने उलगडले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत तुकाराम महाराजांची कन्या भागीरथी यांचा उल्लेख करत बाप-लेकीच्या प्रेमाची हृदयस्पर्शी कहाणी सांगितली. वडील वारल्याची बातमी भागीरथीला भाजीवालीकडून कळते आणि त्यानंतर तिच्या मनातील वेदना कशा उसळतात, याचे अत्यंत जिवंत चित्रण त्यांनी केले. या कथनादरम्यान उपस्थित अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.
सृष्टीताई यांचा दमदार आवाज, भावपूर्ण गायन आणि कृष्णा महाराज पिंगळे यांचे उत्तम पखवाज वादन यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय व भावनिक झाले होते. या कीर्तनावेळी कै.वाल्हू हरिभाऊ वाळुंज यांच्या कन्या सौ. मंगल गोपाळे यांनी हातात वीणा घेत कीर्तनात सहभाग नोंदवला, ही बाब विशेष लक्षवेधी ठरली.
या प्रसंगी वाळुंज कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी श्री. राजेंद्र वाळुंज पाटील (उपसरपंच, लोणी), श्री. संदीप शेठ आढाव (पोलीस पाटील, लोणी), श्री. गुलाब वाळुंज पाटील (अध्यक्ष, तंटामुक्ती समिती, वाळुंजनगर),श्री. बाळासाहेब वाळुंज (ग्रा.पं.सदस्य वाळुंजगर),श्री.हंताराम महाराज गोपाले , श्री, काशिराम वाळुंज,श्री. राजाराम वाळुंज,श्री. दिनकर वाळुंज पा., श्री.बबन विठोबा वाळुंज पा., श्री. मनोहर वाळुंज पा. (युवा नेते), श्री. नितीन आढाव, दिगंबर तात्या सोनवणे, तसेच समाजभूषण पत्रकार कैलास गायकवाड आणि मान्यवर, सर्व लोणी ग्रामस्थ व महिला मंडळ, मराठा प्रतिष्ठान सदस्य व ज्येष्ठ नागरिक उपस्थिती होते. कीर्तन कार्यक्रम नंतर सर्व महाराज सत्कार लोणी ग्रामस्थ व लोकनेत्यांनी केला यावेळी निवेदन श्री. बाळासाहेब दरेकर (गुरुजी,फाकटे) व श्री.बाळासाहेब वाळुंज पा. (ग्रा.पं.सदस्य वाळुंजगर) यांनी केले.
सकाळी ११:३० वाजल्यापासून आगमनापर्यंत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
सायंकाळी ७:०० वाजता कानिफनाथ भजनी मंडळ (पूर) यांच्या वतीने मंत्रमुग्ध करणारी भजन सेवा सादर करण्यात आली. यावेळी बागवस्तीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भजन सेवेत मित्र श्री. प्रसाद महाराज ताम्हाणे (वाफगावकर) यांनी तबला वादन व गायनाची उत्कृष्ट साथ दिली. कार्यक्रमाच्या शेवटी तेजस बाळासाहेब वाळुंज (पत्रकार) यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थ, नातेवाईक ,महिला, बंधू- भगिनी लोकनेते व जेष्ठ मान्यवर यांचे दुःखाच्या प्रसंगी वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. तसेच मामा-भाचे केटर्स, मामा-भाचे मंडप स्पीकर्स, प्रतीक फ्लेक्स (उत्तम बॅनर व छपाई) आणि कौटकर वॉटर सप्लाय व स्वराली ऍक्वा (पाण्याची सुविधा) यांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले. भावपूर्ण व भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.