logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दुचाकीच्या डिक्कीतून लांबविले मक्तेदाराचे आठ लाख रुपये



जळगाव : बँकेतून काढलेले १० लाख

रुपये डिक्कीत ठेवून जाताना दुचाकी पंक्चर झाली व पंक्चर काढत असताना अज्ञात चोरट्यांनी डिक्कीतून आठ लाख रुपये लांबविले. सुदैवाने डिक्कीत दोन लाख रुपये सुरक्षित राहिले. ही घटना बुधवारी २५ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास नवीपेठेत जुन्या बसस्थानकासमोरील गल्लीत घडली.

मजुरांना पैसै द्यायचे असल्याने मक्तेदार मयुर रवींद्र चौधरी यांनी त्यांचे सुपरवायझर प्रेम महारू जाधव यांना बँकेत पैसे काढण्यास पाठविले होते. रक्कम काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवून जात असताना काही अंतरावरच दुचाकी पंक्चर झाली. त्यामुळे पंक्चरच्या दुकानावर सुपरवायझरने दुचाकी लावली व पंक्चर काढत असताना सुपरवायझर समोरील नाश्ताच्या दुकानावर गेले असताना इकडे एक जण डिक्कीतून आठ लाख रुपये काढून पसार झाला. नाश्ता घेऊन आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.


चार जण फुटेजमध्ये कैद

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राहुल गायकवाड, शहर पोलिस ठाण्याचे पो.नि. सागर शिंपी, एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल आदी पोहचले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात चार जण दुचाकीवरून जाताना दिसत आहेत. यासंदर्भात प्रेम जाधव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अनोळखीविरूध्द गुन्हा दाखल आहे.

0
12 views

Comment