logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जनता विद्यालयात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी


पिंपळगाव सराई, दि. २३ फेब्रुवारी २०२६ – येथील जनता विद्यालयात संत गाडगेबाबा जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ शिक्षक गजानन पाटोळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. वातावरणात भक्तिभाव आणि प्रेरणादायी ऊर्जा जाणवत होती. कार्यक्रमाचे संयोजक रवींद्र खानंदे यांनी प्रास्ताविक करताना जयंतीचे औचित्य स्पष्ट केले. त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडत संत गाडगेबाबांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला. समाजातील अंधश्रद्धा, अस्वच्छता आणि विषमता दूर करण्यासाठी गाडगेबाबांनी केलेल्या कार्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
प्रमुख वक्ते गजानन पाटोळे यांनी आपल्या भाषणात सांगितले, "हातात झाडू घेऊन गाडगेबाबांनी केवळ रस्तेच नाही, तर माणसांच्या मनातील अस्वच्छताही दूर केली." त्यांच्या या विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागृत झाली.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रमोद ठोंबरे म्हणाले, "संत गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छतेचा आणि स्वावलंबनाचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना दिलेली खरी आदरांजली ठरेल." त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘कर्मयोगी संत गाडगेबाबा’ ही नाटिका सादर केली. नाटिकेमधून गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश, अंधश्रद्धेविरुद्धचा लढा आणि समाजप्रबोधनाचे कार्य प्रभावीपणे उभे राहिले. विद्यार्थ्यांच्या अभिनयाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. अनुष्का गवते हिने आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने केले. तर आभार प्रदर्शन इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी सलोनी सुभाष धांडे हिने केले.
कार्यक्रमानंतर गावातील प्रमुख चौकात ‘कर्मयोगी संत गाडगेबाबा’ या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. या नाटिकेला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गावातील प्रतिष्ठित नागरिकांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विज्ञान शिक्षक देविदास दळवी, शारीरिक शिक्षक विकास गवई, कर्मचारी राजेश कुंजरगे, राजू सरगड, माजी विद्यार्थी तुषार इंगळे तसेच स्टेट बँक शाखा पिंपळगाव सराईचे व्यवस्थापक उमेश मोरे यांनी विशेष सहकार्य केले.
संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, समता आणि समाजसेवेचे संस्कार रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

13
1394 views

Comment