महाराष्ट्र भाजपाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा; 'मिशन २०२६' साठी टीम सज्ज!
मुंबई: भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बहुप्रतिक्षित घोषणा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्ष संघटना अधिक आक्रमक करण्याच्या उद्देशाने अनुभवी नेते आणि तरुण चेहऱ्यांचा समतोल या नवीन टीममध्ये साधण्यात आला आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, "भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता समर्पित भावनेने काम करतो आणि याच कार्यशैलीमुळे जनतेचा पक्षावरील विश्वास वृद्धिंगत झाला आहे. या नवीन नियुक्त्यांमुळे पक्ष संघटना अधिक बळकट होईल."