logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; आरोग्य आणि सामाजिक उपक्रमांना देणार हजेरी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; आरोग्य आणि सामाजिक उपक्रमांना देणार हजेरी

बुलढाणा
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या मुंबई, शेगाव आणि नागपूर येथील महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असून, आरोग्य आणि सामाजिक परिवर्तनावर त्यांचा भर असणार आहे.
आरोग्य मोहिमेचा श्रीगणेशा
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, २४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती मुंबईत पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलच्या 'सेव्हिंग लाइव्ह्स अँड बिल्डिंग अ हेल्दीअर भारत' या मोहिमेचे उद्घाटन करतील. देशातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करणे आणि जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
शेगावमध्ये 'राष्ट्रीय आरोग्य मेळा'
२५ फेब्रुवारी रोजी सकाळी राष्ट्रपती बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे भेट देतील. येथे आयुष मंत्रालयातर्फे आयोजित 'राष्ट्रीय आरोग्य मेळा २०२६' चे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या मेळ्याच्या माध्यमातून आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार यांसारख्या भारतीय उपचार पद्धतींचा प्रचार केला जाणार आहे. यावेळी राज्यपाल आणि केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचीही उपस्थिती असेल.
नागपुरात 'सुवर्णयुग' अभियानाचा शुभारंभ
शेगावचा कार्यक्रम आटोपून राष्ट्रपती नागपूरकडे प्रयाण करतील. नागपुरात ब्रह्माकुमारी संस्थेच्या 'एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचे सुवर्णयुग' या अभियानाचा त्या शुभारंभ करतील. राष्ट्रपतींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर आणि शेगावमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचा दौरा पूर्ण केल्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी त्या झारखंडमधील जमशेदपूरकडे रवाना होतील.

14
987 views

Comment