logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*राहुरी पोलीस स्टेशनमध्ये ‘खाजगी व्यक्ती’चा शिरकाव? तो नेमका कोण आणि कोणाच्या जोरावर?*

*राहुरी पोलीस स्टेशनमध्ये ‘खाजगी व्यक्ती’चा शिरकाव? तो नेमका कोण आणि कोणाच्या जोरावर?*


राहुरी येथील राहुरी पोलीस स्टेशन मध्ये सुरू असलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय कागदपत्रांच्या परिसरात एका खाजगी व्यक्तीचा मुक्त वावर दिसत असल्याच्या दाव्यांमुळे प्रशासनाच्या कारभारावर थेट प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हा मुद्दा समोर आणत वंचित बहुजन आघाडी चे उपतालुकाध्यक्ष गणेश पवार यांनी तात्काळ, निष्पक्ष आणि सार्वजनिक चौकशीची मागणी केली आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक अनोळखी व्यक्ती पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वावरताना आणि स्टेशन डायरी, मुद्देमाल जप्ती रजिस्टर, एफआयआर रजिस्टर यांसारख्या संवेदनशील नोंदींच्या जवळ दिसत असल्याचा दावा आहे. तो कोण? कोणत्या आदेशावर पोलीस स्टेशनमध्ये काम करत आहे? त्याची अधिकृत नियुक्ती आहे का? असल्यास आदेशपत्र सार्वजनिक का केले जात नाही? नसल्यास शासकीय कार्यालयात त्याचा वावर कसा आणि का?
राहुरी पंचक्रोशीत थेट सवाल झडत आहेत—
खाजगी व्यक्तीला इतकी मोकळीक कशी?
शासकीय नोंदींच्या परिसरात प्रवेश कोणी दिला?
नियंत्रण यंत्रणा नेमकी कुठे आहे?
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीत हा प्रकार आहे का?
काही ठिकाणी गंभीर शंका व्यक्त केल्या जात आहेत; मात्र या सर्व बाबींची सत्यता केवळ निष्पक्ष चौकशीमधूनच स्पष्ट होऊ शकते. जर प्रत्यक्षात पोलीस कर्मचाऱ्यांची काही कामे खाजगी व्यक्तीकडून होत असतील, तर ही बाब अत्यंत गंभीर ठरू शकते. संवेदनशील नोंदींमध्ये संभाव्य हेराफेरी, माहितीची गळती किंवा प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
गणेश पवार यांनी संबंधित व्यक्तीची ओळख, भूमिका आणि अधिकार अधिकृतरीत्या जाहीर करावेत, तसेच नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी केली आहे.
आता प्रश्न सरळ आहे—तो खाजगी व्यक्ती नेमका कोण आणि कशासाठी पोलीस स्टेशनमध्ये वावरतो आहे? प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करून जनतेसमोर सत्य मांडावे. कारण राहुरीकरांना आश्वासन नव्हे, तर ठोस उत्तर हवे आहे.

*राहुरी प्रतिनिधी – चंद्रकांत जगधने*

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

8
681 views

Comment