logo

माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या निर्णयामुळे बळ मिळाले .आहे.

माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या निर्णयामुळे बळ मिळाले आहे. नुकत्याच सादर झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २०२६-२७ या वर्षाच्या अर्थसंकल्पात कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रकल्पांसाठी तब्बल ४ हजार ८९७.१९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो, रस्ते, उन्नत मार्ग, पहिला डबल डेकर उन्नत मार्ग मार्गी लागणार आहे. अशा सुरू असलेल्या प्रकल्पांची आज प्रत्यक्ष स्थळपाहणी केली आणि आढावा घेतला.


पलावा उड्डाणपूलः पलावा येथे दुसऱ्या पुलाची उभारणी प्रगतीपथावर असून त्याचे काम वेगाने सुरू आहे. याच भागातील जुना रेल्वे पूल हटवून नवा पूल तयार केला जातो आहे. त्याचे कामही लवकरच पूर्ण होणार असून त्यामुळे येथील वाहतूक गतीमान होणार आहे.

ऐरोली - काटई उन्नत मार्गः ऐरोली काटई उन्नत मार्ग (फ्री वे) टप्पा ३ च्या उभारणीसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ९०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. काटई भागात मेट्रो, एक्सेस कंट्रोल मार्ग, ऐरोली काटई मार्ग उतरतो. येथूनच डबल डेकर मार्गही जाणार आहे. याच भागातून रिंगरोडचा एक टप्पाही जातो. त्यामुळे या भागातील कामाचा आढावा घेतला.

मेट्रो १२ आणि मेट्रो १२ अः कल्याण ते तळोजा या मेट्रो १२ मार्गाचे काम वेगाने सुरू असून याच मार्गाच्या विस्तारीकरणाचा ऐतिहासिक निर्णय नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जाहीर केला. मेट्रो १२ अ या प्रकल्पासाठी ८ हजार ४१४.५३ कोटींच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे त्यामुळे विस्तारीत डोंबिवलीसह, मानपाडा, कटाई नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसार मोरी, दहिसारगाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव या भागातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. तर मेट्रो १२ च्या कामासाठी यंदाच्या वर्षात १ हजार ५४.५४ कोटींची तरतूद केली आहे.

तिसरा पत्री पूलः तिसऱ्या पत्री पुलाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाचाही आज आढावा घेतला. लवकरच हाही पूल नागरिकांच्या सेवेत दाखल होईल.

कल्याण रिंग रोडः कल्याण रिंग रोडच्या कामासाठी एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात ६०० कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली असून तिसऱ्या टप्प्यासाठीही निधी मिळाला आहे. या प्रकल्पातील टप्पा क्रमांक ४, ५, ६ सेवेत आहेत.

मेट्रो ५, मेट्रो ५ अ, मेट्रो १४ः ठाणे - भिवंडी - कल्याण या मेट्रो ५ मार्गासाठी १ हजार ३०९.९० कोटी तर दुर्गाडी ते उल्हासनगर - अंबरनाथ या मेट्रो ५ अ मार्गासाठी१८३.३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा मेट्रो मार्ग वेगाने मार्गी लागणार आहे. तर कांजुरमार्ग ते बदलापूर या मेट्रो १४ साठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

वालधुनी ते कल्याण अहिल्यानगर महामार्ग उन्नत मार्गः विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळून वालधुनी नदीच्या लगत थेट कल्याण अहिल्यानगर महामार्गापर्यंत सुरू असलेल्या उन्नत मार्गाच्या कामाचाही आज आढावा घेतला. या प्रकल्पासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

यातील अनेक प्रकल्पांमध्ये भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला असून निधी उपलब्ध झाल्याने प्रकल्प वेगाने मार्गी लागतील यासाठी नियोजनबद्ध कामाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. कल्याण लोकसभा मतदारसंघातील महत्वाकांक्षी वाहतूक प्रकल्पांना गती दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, एमएमआरडीए प्रशासनाचे यावेळी आभार मानले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, एमएमआरडीए, महसूलचे अधिकारी, कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर, उपमहापौर, आयुक्त, ज्येष्ठ नगरसेवक, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
[21/02, 7:24 am] devashishtokekar05: Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
99 views