logo

राहुरीतील अल्पवयीन मुलीवर जंगलात ०५ दिवस अत्याचार करणारे ०३ आरोपी धरले;लव्ह जिहादची चर्चा...


राहुरीतील अल्पवयीन मुलीवर जंगलात ०५ दिवस अत्याचार करणारे ०३ आरोपी धरले;लव्ह जिहादची चर्चा...


राहुरी (शिवप्रहार न्यूज)- राहुरी तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिला तब्बल ०५ दिवस जंगलात ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. परिसरातील चर्चेत या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चा विषय असल्याचे सांगितले जात असून राजकीय वातावरणही तापलं आहे.या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राहुरी पोलिसांनी कारवाई करत नाशिक-सुरत रोडलगत रामशेज किल्ला परिसरातील जंगलातून मुलीची सुटका केली आहे.मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. 13 फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली 15 वर्षीय मुलगी परतलीच नाही. पालकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगाने हलवली आणि अखेर जंगल परिसरातून मुलीची सुटका करण्यात यश मिळालं.
या प्रकरणात मुख्य आरोपी मुक्तार हैदर पठाण, कौसर हैदर पठाण , आकाश शरद संसारे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपीवर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. पीडितेच्या जबाबानुसार पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराची कलमे लावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेच्या निषेधार्थ संबंधित मुलीच्या गावात बंद ठेवण्यात आला होता.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
99 views