logo

वर्धा:- वर्धा जिल्हा ऑटो चालक मालक संघातर्फे संविधान चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी..

वर्धा :-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मिताने संविधान चौक येथे 19 फेब्रुवारी ला सायंकाळी 6 वाजता विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यावेळेस प्रमुख पावणे म्हणून भीम आर्मीचे जिल्लाध्यक्ष प्रदीप भाऊ कांबळे (रावण )उपस्थित होते. तर सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक प्रमोदजी खंडारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त संबोधित केले, व वर्धा जिल्हा चालक मालक संघांचे शाखाध्यक्ष विनोद भाऊ कांबळे शाखा उपाध्यक्ष प्रवीण भाऊ लोहकरे यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले, उपस्थित ऑटो युनियन सदस्य अंबादास चाफले, राजूभाऊ भगत, प्रवीण कोलापे, मधुभाऊ नरांजे, मयूर कांबळे, सोपान गायकवाड, संदीप मेंढे, बबनराव पेटकुले, गोलू खडसे, अशोक पंधराम, राकेश मेश्राम, संतोष तुरणकर, संजूभाऊ महाडोळे, गुणवंतभाऊ चौधरी,प्रमोदजी मेश्राम, अजय सावरकर, भगवान बावणे, व सिंधी मेघेतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

29
1706 views