logo

श्रीपूरमध्ये शिवजयंतीनिमित्त रायबा हेच का आपलं स्वराज्य या महानाट्याचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीपूरमध्ये महामानव प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपतींच्या शिव विचारांने स्पर्श करणारे तडाखेबाज महानाट्य जय हो एन्टरटेन्मेंट पुणे निर्मित रायबा हेच का आपलं स्वराज्य या महानाट्यचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीपूरमध्ये हॉटेल दुनियादारी नजीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष
शिवतेजसिंह मोहिते तसेच पाटील भारतकुमार सेठीया मॅनेजिंग डायरेक्टर ब्रिमा सागर महाराष्ट्र डिस्टिलरी लि. कं. श्रीपूर कार्यकारी संचालक डॉ. यशवंतराव कुलकर्णी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन रामचंद्र सावंत पाटील, महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी अशोक चव्हाण, भीमराव रेडे पाटील, उपनगराध्यक्ष अनिल
जाधव, माजी उपसरपंच नगरसेवक नानासाहेब मुंडफणे, गटनेते नगरसेवक राहुल अप्पा रेडे-पाटील, शामराव भोसले, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद सरतापे, माळशिरस तालुका अध्यक्ष नागेश भोसले, जि.प. सदस्य भारत आठवले जिल्हा सचिव आरपीआय नाजीया पठाण नगरसेविका, ज्येष्ठ पत्रकार बी टी शिवशरण, रमेश मामा लोंढे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष योगेश ऊर्फ अण्णा गाडे उपाध्यक्ष अक्षय शिरसट तसेच त्यांना विश्वजीत भालशंकर, अजित भोसले, प्रथमेश लोंढे, सतीश हाके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा सर्व कार्यक्रम होणार आहेत त्यांना महामानव प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य व खंबीर साथ लाभणार आहे.

18
1291 views