
Aima midiya jan jan ki avaj दिनांक 18.02.2026 9:42am
लंडनमधील वादग्रस्त भाषणाप्रकरणी. राहुल गांधींच्या आवाजाचे नमुने घ्यावेत; सात्यकी सावरकरांचा कोर्
Aima midiya jan jan ki avaj दिनांक 18.02.2026 9:42am
लंडनमधील वादग्रस्त भाषणाप्रकरणी. राहुल गांधींच्या आवाजाचे नमुने घ्यावेत; सात्यकी सावरकरांचा कोर्टात अर्ज.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लंडनमध्ये बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते व खासदार राहुल गांधी यांना सक्षम अधिकारी अथवा न्यायशास्त्र प्रयोगशाळेसमोर (एफएसएल) ) त्यांच्या आवाजाचा नमुना देण्याचे निर्देश द्यावे तसेच सक्षम न्यायवैद्यक प्राधिकरणाला पूर्वीच रेकॉर्डवर असलेल्या रेकॉर्डिंगसह संकलित केलेल्या नमुन्याचे वैज्ञानिक विश्लेषण आणि तुलना करण्याचे निर्देश द्यावेत असा अर्ज फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी मंगळवारी विशेष न्यायालयात सादर केला आहे.
राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक विधान केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. पुण्यातील एमपीएमएलए विशेष न्यायालयात या दाव्याची सुनावणी सुरू आहे. बचाव पक्षाकडून फिर्यादी सात्यकी सावरकर यांची उलट तपासणी चालू आहे. सुनावणीदरम्यान सात्यकी सावरकर यांचे वकील अँड संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात राहुल गांधी यांच्या आवाजाचे नमुने घेण्यासंबंधीचे निर्देश दयावेत असा अर्ज केला आहे. न्यायालयाला आरोपी किंवा साक्षीदाराला असे नमुने देण्यास भाग पाडण्याचे पुरेसे अधिकार आहेत. विशेषतः, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीनएसएस ), २०२३ च्या कलम ३४९ नुसार दंडाधिकाऱ्यांना या संहितेअंतर्गत कोणत्याही तपासासाठी किंवा कार्यवाहीसाठी कोणत्याही व्यक्तीला आवाजाचे नमुने देण्याचे आदेश देण्याचा अधिकार आहे. कारण तो संशयिताची ओळख पटविण्यासाठी एकट्याने केलेल्या गुन्ह्याच्या कबुलीऐवजी वैज्ञानिक तुलना वापरून महत्त्वाचा पुरावा म्हणून काम करतो असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांच्या वकिलांकडून उलटतपासणी दरम्यान शंका उपस्थित
राहुल गांधी यांचे वकील अँड मिलिंद पवार यांनी फिर्यादी सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी घेतली. राहुल गांधी यांच्या विरोधात सुरुवातीला प्रथमवर्ग न्यायाधीश अक्षी जैन यांच्या न्यायालयासमोर तीन वेळा युक्तिवाद झाला. मात्र, न्यायाधीश प्रकरणाची दखल घेण्यास तयार नसल्यामुळे वारंवार तारखा पडत होत्या हे फिर्यादीकडून मान्य करण्यात आल्याचा दावा अँड पवार यांनी केला. दि. ५ ऑगस्ट २०२३ रोजी सात्यकी सावरकर यांनी अक्षी जैन या तत्कालीन न्यायाधीशांवर गंभीर आक्षेप घेत, भारतीय दंड संहितेतील कलम ४०८ अंतर्गत प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे यांच्यासमोर ट्रान्सफर पिटीशन दाखल केली. हा खटला दुसऱ्या सक्षम न्यायालयात वर्ग होईपर्यंत सुनावणी स्थगित करण्याची मागणीही करण्यात आली होती. ट्रान्सफर पिटीशनची दखल घेत तत्कालीन प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी न्यायाधीश अक्षी जैन यांच्याकडून गोपनीय अहवाल मागवला. मात्र ट्रान्स्फर पिटीशन प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या समोर प्रलंबित असताना फिर्यादीच्या बाजूने पहिला आदेश पारित केला. न्यायालयात उलटतपासणी दरम्यान राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी सात्यकी सावरकर यांना विचारलेल्या प्रश्नांना 'हो' अशी उत्तरे दिल्याचे अॅड पवार यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेबाबत अॅड पवार यांनी गंभीर शंका उलटतपासात उपस्थित केल्या. प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना पाठविण्यात आलेला गोपनीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात यावा, असा अर्ज अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी केला असून, त्यावर पुढील सुनावणी २३ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.