logo

नांदेडात काँग्रेसचे धरने आंदोलन मोदींच्या : राजीनाम्याची मागणी

नांदेडात काँग्रेसचे धरने आंदोलन
मोदींच्या : राजीनाम्याची मागणी

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज संतापाचा ज्वालामुखी उसळला! “मोदी–एपस्टीन भाई भाई”, “मोदी राजीनामा द्या” अशा आक्रमक घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि सत्तेच्या अहंकाराला जनतेने थेट इशारा दिला. देशाच्या नैतिकतेचा गळा घोटणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नांदेड येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

मोदी सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या ट्रेड डीलमुळे भारतीय शेतकऱ्यांना गुलामीच्या खाईत ढकलण्याचा मार्ग मोकळा केला असून त्याचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत.

दुसरीकडे एपस्टीन फाईल्समध्ये मोदींचे नाव तब्बल ३३ वेळा आल्याचा धक्कादायक आरोप होत असताना सरकारकडून मौन धारण केले गेले आहे — हे मौन संशयाला अधिक बळ देणारे आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.

याचबरोबर चीनची घुसखोरी, राष्ट्रीय सुरक्षेतील ढिसाळपणा आणि निर्णयक्षमतेचा अभाव यामुळे देश धोक्यात असल्याचा आरोपही करण्यात आला. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी आपल्या पुस्तकात मांडलेल्या बाबींचा उल्लेख करत “सरकारकडे दिशा नाही, धैर्य नाही आणि जबाबदारीची जाणीव नाही” अशी जोरदार टीका करण्यात आली.

देश आर्थिक, कृषी आणि सुरक्षेच्या आघाडीवर अपयशी ठरत असताना सत्ताधारी मात्र प्रचारात व्यस्त आहेत. जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढणाऱ्या आणि नैतिक आधार गमावलेल्या सरकारला आता सत्तेत राहण्याचा अधिकार नाही — म्हणूनच “मोदी राजीनामा द्या” ही मागणी जनतेच्या आवाजातून घुमत आहे, असे आंदोलकांनी ठणकावून सांगितले. देश वाचवायचा असेल तर सत्ता बदल आवश्यक आहे. आणि त्याची सुरुवात मोदींच्या राजीनाम्यानेच होईल

या आंदोलनात खासदार रविंद्र चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष डॉ यशपाल भींगे, सरचिटणीस डॉ. रेखाताई चव्हाण, केदार सांळूखे, श्रवन रॅपनवाड सुरेंद्र घोडजकर नांदेड जिल्हा काँग्रेस उतर अध्यक्ष राजेश पावडे, दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, महानगर अध्यक्ष अब्दूल सत्तार कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, महेश देशमुख तरोडेकर ,भगवानराव मनुरकर, कुमार कुर्तडीकर, सरचिटणीस आनंद कल्याणकर, मुन्ना ऊर्फ संदिप देशमुख तरोडेकर,मुन्ना शाब्बास, आनंदराव चव्हाण, एकनाथराव मोरे, तालूका अध्यक्ष गजानन पावडे, नगरसेवक सत्यपाल सावंत, पाशाभाई, शेरआली, प्रा. ललिता कुंभार, आशाताई कदम, सुभाष लोणे, बाबासाहेब देशमुख आंबेगावकर, आदी सहभागी झाले होते.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
99 views