logo

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळखाबी विद्यार्थी व विद्यार्थिनी भाजीपाला विक्रीसाठी ठेवण्यात आला होता

बाल आनंद मेळावा

जि.प.प्राथमिक शाळा माळखांबी शाळेमध्ये दिनांक 13/2/2026 रोजी बाल आनंदी बाजार व खाद्यपदार्थाचे स्टॉल खरेदी व विक्री मेळावा आयोजित करण्यात आला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गावचे सरपंच सौ. मंगलताई पुजारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. सारिका प्रताप साठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
बाल आनंद बाजार कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
बाल विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, फळे फार मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणले होते.
इडली सांबर, पाणीपुरी, भेळ, वडापाव, सामोसे, ढोकळा, गुलाबजाम, आप्पे, भजी ,डोसे, शेंगदाण्याची चटणी, लोणच, बाजरीच्या कडक भाकरी, खारमुरे, मंचुरियन, आलू पराठा, मसालेभात, शेंगदाण्याचे लाडू वेफर्स, चॉकलेट पुढे बिस्किटे,अशाप्रकारे सर्व खाद्यपदार्थाचे स्टॉल शाळेतील बाल विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लावले होते.
सर्वच पालकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक प्राप्ती झाली होती. सर्वच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
गावातील सर्वच माता पालकांनी, व पालकांनी या बाल बाजाराला भेट देऊन विद्यार्थ्याकडून विद्यार्थिनींना आणलेले भाजीपाला खाद्यपदार्थ आनंदाने खरेदी केले.
विद्यार्थ्यांना खरेदी विक्री व्यवहार कसा करावा याची यथोचित प्रचिती आली. सदर आनंदी बाजारात साधारणतः 25 हजार रुपये ची विक्रमी उलाढाल झाली.सौ हेमलता जावीर अनिल जावीर अनिल रेडे शिक्षण विस्ताराधिकारी सौ भक्ती नाचणे मॅडम बोरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री विजयकुमार देशमुख बोरगाव केंद्रातील शिक्षक श्री कांबळे सर श्री शितोळे सर श्री गोडसे सर श्री रसाळ सर टोणपे मॅडम भोसले मॅडम यांनी सुद्धा खरेदी केली आणि आठवडा बाजार याची सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले

12
507 views