logo

सिंदपुरी रुयाळ येथे त्याग मूर्ती रमाई जयंती निमित्त प्रबोधन कार्यक्रम यशस्वी केंद्रीय संविधान रक्षक संघटनेच्या वर्धापन कार्यक्रमात विविध उपक्रम


सिंदपुरी रुयाळ येथे त्याग मूर्ती रमाई जयंती निमित्त प्रबोधन कार्यक्रम यशस्वी
केंद्रीय संविधान रक्षक संघटनेच्या वर्धापन कार्यक्रमात विविध उपक्रम

विलास केजरकर भंडारा.

भंडारा --डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना व महिला अधिकार सामाजिक संघटनेतर्फे पवनी तालुक्यातील सिंदपुरी रुयाळ येथे केंद्रीय संविधान रक्षक संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती, प्रबोधन कार्यक्रम, भोजनदान, पाणी वाटप तसेच केंद्रीय संविधान रक्षक चे प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, सन्मान प्रमाणपत्र, नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक भाविक सुखदेवे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रेस संपादक तथा पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, सदानंद धारगावे केंद्रीय संविधान रक्षक संस्थापक/सचिव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून भिक्खू संघ, नम्रता बागडे अध्यक्षा महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटना, लक्ष्मण दुबे, जीवन बोधी बौद्ध, वैशालीताई चेंबूरकर, भीमराव वैद्य, तागडे, पांडुरंग नंदागवळी, लक्ष्मण दुबे, आस्तिक नंदागवळी, कविता सुखदेवे, स्वामींनी मेश्राम, हर्षा मेश्राम, सारिका नागदेवे महासचिव महाराष्ट्र राज्य, शोभना सरोजकर विदर्भ अध्यक्षा, वैशाली वालदे विदर्भ महासचिव, वैशाली रामटेके भंडारा जिल्हाध्यक्ष, सीमा काळे भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेकरिता अस्मिता नगराळे नागपूर जिल्हा अध्यक्षा, भावना शेंडे, स्नेहल मेश्राम, भारती कांबळे, पूजा पाटील, ज्योती रामटेके, पोर्णिमा वैद्य, भीमराव वैद्य, घरडे सर, आस्तिक नंदा गवळी, कविता सुखदेवे, स्वामिनी मेश्राम, हर्षा मेश्राम, संघमित्रा चव्हाण, अर्पणा जांगडे, दिपाली गजभिये, बिंदूताई रामटेके, आशिष मेश्राम, पांडुरंग नंदागवळी, हेमंत मेंदवाडे, पचारे सरपंच व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटना, विदर्भवादी शेतकरी संघटना व केंद्रीय संविधान रक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

5
186 views