logo

बगडिया महाविद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न

रिसोड:- स्थानिक उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रिसोड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. ए. जी. वानखेडे व अर्थशास्त्र विभागातील प्रा. डॉ. मनोज नरवाडे यांच्या पुढाकाराने दि. ०९/०२/२०२६ रोजी अर्थशास्त्रावरील सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत महाविद्यालयातील बी. ए. व बी. कॉम. शाखेतील बहुसंख्या विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धेत प्रथम क्रमांक दिपाली मगर तर द्वितीय क्रमांक दिव्या खंदारे व तृतीय कविता राजपुरोहित या विद्यार्थ्यांनी मिळविला. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक प्रश्नाची जाणिव निर्माण होउन या जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक प्रश्न समजून त्याणी आपली व पर्यायाने देशाची प्रगती करवी हा होता. हि स्पर्धा यशस्वी करण्या करिता डॉ. बुधवंत, प्रा. टिकार, डॉ. नंदेश्वर, डॉ मंगल. खेडेकर, डॉ. मेश्राम, डॉ. कोमल काळे, प्रा. मनवर , प्रा. पांढरे श्री.ओंकार पुरी,सेवक सुरज नरवाडे, सुनील च-हाटे यांनी सहकार्य लाभले स्पर्धेचे आयोजन वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाद्वारे करण्यात आले.

0
77 views