logo

काकाच्या घरी आलेल्या पुतण्याने केली आत्महत्या

जळगाव : काकाच्या घरी आलेल्या कौस्तुभ सतीश पोतदार (२७, रा. नवनाथ नगर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ७ फेब्रुवारी रोजी नवनाथ नगरात घडली.

नाशिक येथे एमआर म्हणून काम करणारे कौस्तुभपोतदार हे जळगावातील नवनाथ नगरात काकांच्या घरी आले होते.

आईचे यापूर्वीच निधन

कौस्तुभ यांच्या आईचे यापूर्वीच निधन झालेले आहे. तर वडील पिंप्राळा परिसरात राहतात. तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ८ रोजी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
७ रोजी काका व घरातील इतर सदस्य बाहेर गेलेले असताना कौस्तुभ यांनी गळफास घेतला. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.

या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी करीत आहेत.

1
441 views