logo

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा, समर्पण आणि अंत्योदय या मूलमंत्रातून प्रेरणा घेत माणुसकी प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा ‘मायेची ऊब’ हा उपक्रम



नांदेड :

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा, समर्पण आणि अंत्योदय या मूलमंत्रातून प्रेरणा घेत माणुसकी प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा ‘मायेची ऊब’ हा उपक्रम आठव्या वर्षीही जोमाने राबवण्यात आला. मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या विचारांची साक्ष देत धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ४० रात्री मध्यरात्री शहरातील रस्त्यांवर फिरून, थंडीने कुडकुडत पडलेल्या बेघरांच्या अंगावर २०२६ ब्लॅंकेट पांघरून देण्यात आली. त्यानंतर महापालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना ब्लॅंकेट वाटप करून या सेवाभावी उपक्रमाची सांगता करण्यात आली.*

“जितके वर्ष तितके ब्लॅंकेट” हे सूत्र जपत मायेची ऊब हा उपक्रम भाजपा नांदेड महानगर, अमरनाथ यात्री संघ, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि सन्मित्र फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी राबवला जातो. या सामाजिक उपक्रमास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजपा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे, भाजपा अध्यक्ष अमरनाथ राजुरकर, डॉ. संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख,लायन्स उप प्रांतपाल योगेश जायस्वाल, लायन्स सेंट्रल अध्यक्ष डॉ.अमोल हिंगमिरे,सन्मित्र फॉउंडेशन चे डॉ. दि. बा. जोशी यांचे मार्गदर्शन यांचे मार्गदर्शन लाभले.

यावर्षी ब्लॅंकेट देणाऱ्या दात्यांमध्ये संजय लाहोटी, ॲड. दिलीप ठाकूर, रूपेश वट्टमवार, सन्मित्र फाउंडेशन, सीतारामजी जाजु, लीलादेवी सितारामजी जाजू, स्नेहल संजय जाजू, प्रमोद हिबारे, ला. योगेश जायस्वाल, अशोक पडगीलवार, डॉ. तेजस्विनी पांडुरंग जोशी, स्नेहलता जायस्वाल, दिलीपराव धर्माधिकारी, शशिकांत देशपांडे (बाऱ्हाळी), सौ. अंकीता रुपेश मुत्तेपवार, डॉ. राजेंद्र मुंदडा, ऋचा मुंदडा (बेंगलोर), मोहित व रेणुका सोनी, प्रा. प्रभाकर उदगीरे, डी. एच. अग्रवाल, रेणुकाई निवास, अज्ञात दाता, अविनाश चिंतावार (डोंबिवली), अबिरा गौरी राहुल पवार, साईनाथ पदमवार, संजय खुपसे, कैलाश झंवर (परभणी), सौ. गयाबाई शेषराव कदम, सोनाली वारले, शिवराज मनजित विंचूरकर, केदार आनंद इनामदार, सुरेश पळशीकर,अज्ञात दाता, विश्वेश्वर नांदेडकर, तिरुपती पाटील कल्याण (नायगाव), सुधाकर रामराव जबडे (देगलूर), प्रा. डॉ. एस. एस. झंपलवाड (मुखेड), हरिसिंह चव्हाण (कोंडलवाडी), डॉ. भगवान केंद्रे (गंगाखेड), सतीश सुगनचंदजी शर्मा, सौ. अलका मिलिंद पेकमवार, प्राचार्य सुधीर शिवणीकर, अशोक गंजेवार, चि. अन्वय अक्षय गोधमगांवकर, चि. जय आल्हाद गोधमगांवकर, लक्ष्मी टेंकाळे, डॉ. अनिता पुदरोड, सिद्राम सूर्यभान दाडगे, रागिणी जोशी, कमलबाई सारडा, कंचन खटोड (इचलकरंजी), अभिलाषा मालपाणी (बेंगलोर) यांचा समावेश होता.

या उपक्रमासाठी सुरेश लोट, अरुण काबरा, सुरेश शर्मा, कामाजी सरोदे, संतोष भारती, सुरेश निलावार, जयश्री ठाकूर, सविता काबरा, संगिता यादव, भोला धुमाळ, रोहन यादव, शिवा लोट, राजेशसिंह ठाकूर, जनार्धन वाकोडीकर,अंकित शर्मा, शिवचरण लोट यांनी दररोज रात्री बाराच्या सुमारास शहरातील विविध भागांत जाऊन प्रत्यक्ष ब्लॅंकेट वाटप केले. रेल्वे स्टेशन, बस स्थानक, शंकरराव चव्हाण रुग्णालय (विष्णुपुरी), श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक रुग्णालय, महिला रुग्णालय (श्यामनगर), लहुजी साळवे अनाथाश्रम आणि संध्या छाया वृद्धाश्रम येथे ब्लॅंकेट वितरित करण्यात आले. याशिवाय महापालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही ब्लॅंकेट देण्यात आले.

दरम्यान, मायेची ऊब उपक्रमाच्या नवव्या वर्षाची सुरुवात नोव्हेंबर महिन्यात मोदी ग्राउंड नांदेड येथे होणाऱ्या प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या शिव महापुराण कथेदरम्यान होणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली.
==============
(योग्य ते शीर्षक निवडा )

1. मोदींच्या ‘सेवा’ मंत्राचा नांदेडमधील प्रत्यय : दिलीप ठाकूरांची मायेची ऊब
2. मोदी विचार, ठाकूर कृती : मायेची ऊब ठरली माणुसकीचा आदर्श
3. मोदींच्या सेवाभावातून प्रेरित दिलीप ठाकूरांचा मायेची ऊब उपक्रम
4. ‘सबका साथ, सबका विकास’ची उब : दिलीप ठाकूरांनी उतरवला मोदी विचार रस्त्यावर
5. मोदींच्या सामाजिक संकल्पनेचा जिवंत आविष्कार : दिलीप ठाकूरांची मायेची ऊब
6. मोदी युगातील संवेदनशील राजकारण : दिलीप ठाकूरांचा सातत्यपूर्ण सेवायज्ञ
7. मोदींच्या प्रेरणे तील सेवा संस्कृती : मायेची ऊब आठव्या वर्षीही कायम
8. सत्तेत असूनही सेवेत अग्रेसर : मोदी विचारातून प्रेरित दिलीप ठाकूर
9. मोदींच्या ‘अंत्योदय’ संकल्पनेला नांदेडमध्ये दिलीप ठाकूरांची मायेची ऊब
10. मोदींच्या सेवाविचाराचा थेट परिणाम : दिलीप ठाकूरांची माणुसकीची मायेची ऊब

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
24 views