logo

मास्टरमाईंड गुजर पोलीस सेवेतून बडतर्फ; श्रीरामपूर हद्दीतून ताब्यात घेतलेल्या ड्रग्जचा केला होता अपहार...


मास्टरमाईंड गुजर पोलीस सेवेतून बडतर्फ; श्रीरामपूर हद्दीतून ताब्यात घेतलेल्या ड्रग्जचा केला होता अपहार...


अहिल्यानगर/श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलिसांनी अटक केलेला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी श्यामसुंदर गुजर हाच ड्रग्ज तस्करीचा मास्टर माईंड निघाला. त्याला पूर्वीच पुणे पोलिसांनी अटक केलेली असून त्याचा ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याच्यावर जप्त मुद्देमालाचा अपहार केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा ड्रग्जचा मुद्देमाल श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीतून जप्त करुन जिल्हा मुख्यालयातील मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आला होता.दरम्यान, पोलिस हेडकॉन्स्टेबल गुजरवर दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याला शासन सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी दिली.
नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत नेमणुकीस असलेल्या गुजर याने जिल्हा पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातून एक कोटी 9 लाख 75 हजारांचे 10 किलो 975 ग्रॅम ड्रग्स चोरल्याचे चौकशी समितीच्या अहवालावरून स्पष्ट झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुणे ग्रामीण एलसीबी व शिरूर पोलिसांनी 18 जानेवारी 2026 रोजी संयुक्त कारवाई करीत शिरूर शहरातील डंबेनाला परिसरातील बाबुरावनगर मोकळ्या मैदानात ड्रग्ज विक्रीसाठी येणार्‍या गॅरेज चालक शादाब रियाज शेख (वय 41) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक किलो 52 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत आरोपी शादाब शेख याचा अहिल्यानगर एलसीबीतील गुजर याच्याशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पुणे एलसीबी व शिरूर पोलिसांनी अहिल्यानगर एलसीबीतील कर्मचारी गुजर याला चौकशी कामी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अहिल्यानगर पोलिसांनी कारवाई करून आणलेले ड्रग्ज मुद्देमाल कक्षातून चोरून विक्री केल्याच्या संशयावरून 21 जानेवारी 2026 रोजी अटक केली. या गुन्ह्यात पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी गुजर याला पोलिस मुख्यालयातील मुद्देमाल कक्षाची तोंडी आदेशानुसार जबाबदारी देण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने श्रीरामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जप्त केलेले अल्प्राझोलम ड्रग्ज एक पांढर्‍या रंगाच्या गोणीत भरून ठेवले होते. गुजर याने त्या गोणीतील 10. 975 किलो ग्रॅम ड्रग्ज काढून त्या जागी मैदा भरला असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. त्या समितीने पोलिस मुख्यालयातील मुद्देमालाची पाहणी करून मोजदाद केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 17 डिसेंबर 2025 रोजी श्रीरामपूर येथे कारवाई करून जप्त केलेल्या ड्रग्जमधून गुजर याने ड्रग्ज चोरी केल्याचे दिसून आले. त्याने पांढर्‍या रंगाच्या गोणीतील अल्प्राझोलम हे 10.975 किलो ग्रॅम ड्रग्ज चोरी केले. त्याची बाजारात 1 कोटी 9 लाख 75 हजार रुपये किंमत आहे. पोलिस कर्मचारी श्यामसुंदर गुजर याने मुद्देमालाचा अपहार केल्याचा अहवाल सादर केला. त्या अहवालावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कबाडी यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.त्यानंतर आता हि बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
66 views