logo

आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी घेतली जी पी नड्डा यांची संसदेत भेट

नागपूर. सावनेर
• केंद्रीय मंत्रिमंडळात या प्रकल्पाच्या कामाला लवकर सुरू करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी केली विनंती.
• रोजगार, औद्योगिक व कृषी विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार.


सावनेरचे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सावनेर येथे भव्य खत प्रकल्पाच्या उभारणीसाठी राज्य शासन व गेल (इंडिया) लिमिटेडने स्वारस्य दाखवले. राज्य शासन आणि गेलमध्ये सामंजस्य करार झाल्यानंतर राज्य शासनाने हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविला. या प्रकल्प निर्मितीच्या कामाला लवकर सुरुवात करण्यात यावी, या उद्देशाने सावनेरचे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी दिनांक 6 फेब्रुवारी 2026 ला खत व रसायन मंत्री जेपी नड्डाजी यांची नवी दिल्ली येथे संसदेत भेट घेतली. हा महत्त्वाकांक्षी खत प्रकल्प लवकर सुरू झाल्यास शेतकऱ्यांना युरिया आणि इतर खतांची उपलब्धता वाढेल, दर स्थिर राहतील आणि आर्थिक लुबाडणुकीपासून संरक्षण मिळेल तसेच प्रादेशिक उद्योगवाढीला चालना मिळून रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सोडविता येईल, असे सांगून केंद्रीय मंत्रिमंडळात या प्रकल्पाच्या कामाला लवकर सुरू करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी त्यांना विनंती केली. गेलचा खत प्रकल्प हा केवळ उद्योग नसून विदर्भाच्या समृद्धीचा, आत्मनिर्भरतेचा आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा दृष्टीकोन आहे. या उच्चस्तरीय भेटीत जेपी नड्डा यांनी या प्रकल्पास प्राधान्य देऊ, असा सकारात्मक प्रतिसाद दिला. विदर्भातील रोजगार, औद्योगिक व कृषी विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.

*गेलच्या खत प्रकल्पासाठी सावनेरची निवड:*
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची 10 एप्रिल 2025 रोजी गेल टीमसोबत बैठक, त्यानंतर 17 जुलै 2025 रोजी GAIL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत खत प्रकल्पासंदर्भात झालेल्या प्राथमिक बैठकीनंतर आणि 4 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाला GAIL कडून या प्रकल्पाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर या प्रकल्पासंबंधीचा अंतिम प्रस्ताव आणि संधी गेल (इंडिया) लिमिटेड द्वारे 12 ऑगस्ट 2025 ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्य शासनाला देऊन तो मंजूर करण्यात आला होता. पाण्याची उपलब्धता, गॅस पाईपलाईनशी जोडणी, लॉजिस्टिक सोय, उद्योगवाढीचे भाकीत आणि अन्नसुरक्षा यांचा विचार करून सावनेर हे स्थळ निवडण्यात आले.

*सावनेर येथे 10 हजार कोटींचा खत प्रकल्प:*
त्या अनुषंगाने, सावनेर येथे GAIL च्या मुंबई-नागपूर-झारसुगुडा नैसर्गिक वायू पाईपलाईन (MNJPL) च्या बाजूने आणि उपयोगाने एक नवीन खत प्रकल्प स्थापन करण्यात येत आहे. गेल (इंडिया) लिमिटेड द्वारे महाराष्ट्रातील सावनेर येथे माननीय पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनातून स्वावलंबी होण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाशी सुसंगत राहून, स्वदेशी युरिया उत्पादन वाढवण्यात भरीव योगदान देण्याचा हा प्रकल्प आहे, ज्यात 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची पहिल्या टप्प्यात क्षमता 1.27 MMTPA असेल, असा हा भव्य प्रकल्प आहे.

*राज्य सरकारचे केंद्र सरकारला पत्र:*
01 सप्टेंबर 2025 ला राज्य सरकारने GAIL च्या प्रस्तावास प्राधान्य देत न्यू इन्व्हेस्टमेंट पॉलिसी (NIP) अंतर्गत मंजुरी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. केंद्र सरकारकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाची वेळेवर अंमलबजावणी आणि कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, अशा आशयाचे विनंतीपत्र रसायन आणि खत मंत्रालयाला पाठविण्यात आले.

*आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्यासह गेलच्या अधिकाऱ्यांनी केली जागेची पाहणी:*
त्यानंतर, सावनेर येथे 10 हजार कोटींच्या भव्य खत प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत 18 नोव्हेंबर 2025 ला सावनेरचे आमदार डॉ आशिषराव देशमुख आणि GAIL तसेच MIDC च्या अधिकारी मंडळाने जागेची पाहणी केली. खुर्सापार, जटामखोरा, जलालखेडा आणि सावळी मोहतकर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत प्रकल्प आराखड्याचा सखोल आढावा घेण्यात आला.

*आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या प्रयत्नांना यश:*
शेतकरीहितार्थ खत निर्मिती प्रकल्प विदर्भात आणण्यासाठी आमदार डॉ आशिषराव देशमुख हे 2023 पासून सातत्याने प्रयत्नरत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि गेलच्या अधिकाऱ्यांसोबत अनेकदा चर्चा करून कृषिमंत्री शिवराज सिंहजी चौहान, खत व रसायन मंत्री जेपी नड्डाजी आणि सहकारमंत्री अमितजी शाह यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. सावनेर येथे खत निर्मिती प्रकल्पासाठी नॅचरल गॅसच्या पाईपलाईनसह अनेक अत्यावश्यक सुविधा उपलब्ध आहेत, ही बाब त्यांनी सर्वांसमक्ष उत्तमरित्या मांडल्यामुळे राज्य शासन व गेलने या प्रकल्पात स्वारस्य दाखवले. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे सरकारने हा प्रकल्प तातडीने मंजूर केला आहे, असे म्हटल्या जात आहे

0
0 views