logo

10 वर्षापासुन फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद...


10 वर्षापासुन फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद...


पाथर्डी (शिवप्रहार न्यूज) याबाबत अधिक माहिती अशी की,श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील पाहिजे फरार आरोपींचा शोध घेवुन त्यांना गुन्ह्यामध्ये अटक करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, रोहित येमुल, आकाश काळे, उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील पाहिजे फरार आरोपींची माहिती काढुन त्यांना ताब्यात घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते.
वर नमुद पथक दिनांक 06/02/2026 रोजी पाथर्डी पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील पाहिजे फरार आरोपींची माहिती काढत असतांना पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 165/2025 भादवि कलम 457, 380 या गुन्ह्यातील फरार आरोपी नामे मिनीनाथ भवरे रा. घाटशिरस, ता. पाथर्डी हा त्याचे राहते घरी आलेला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने तात्काळ घाटशिरस, ता. पाथर्डी येथे मिनीनाथ भवरे याचे राहते घराची माहिती घेवुन खात्री केली असता सदर ठिकाणी एक इसम मिळुन आला. सदर इसमास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव मिनीनाथ भाऊसाहेब भवरे वय 35 वर्षे, रा. घाटशिरस, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या नमुद फरार आरोपीस पाथर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 165/2025 भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
35 views