शिक्षकांमुळेच विद्यार्थी व शाळा आदर्श होऊ शकतात- जि. प. सदस्य रजनिश बन्सोड
खमारी बुटी जि.प.शाळेत स्नेहसंमेलनाचे उद्घाटन
शिक्षकांमुळेच विद्यार्थी व शाळा आदर्श होऊ शकतात- जि. प. सदस्य रजनिश बन्सोड
खमारी बुटी जि.प.शाळेत स्नेहसंमेलनाचे उद्घाटन
भंडारा :- विद्यार्थीवर देशाचा भविष्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यावर योग्य संस्कार संस्कार व सर्वांगीण विकास करून उत्तम व्यक्तिमत्व घडवीत असतांना शिक्षकासोबत पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे. सुसंस्कारीत व्यक्तिमत्व घडविण्यासाठी शिक्षक व पालकांनी एकत्रित येऊन पुढाकार घेणे ही आजच्या काळाची गरज आहे.
ते कारधा केंद्रातंर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खमारी (बुटी) येथे स्नेहसम्मेलन, विज्ञान प्रदर्शनी बुधवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ ला स्नेहसंमेलन उद्घाटन करतांना बोलत होते.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रजनीश बन्सोड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य किशोर ठवकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यीक व नाट्य अभिनेता प्रा. डॉ. शिलवंतकुमार मडामे, भारतीय आट्या पाट्या संघाची कर्णधार तथा सुवर्णपदक विजेती कु. प्राची केशव चटप, सरपंच नलिनी काळे, उपसरपंच आशिष लांजेवार, कारधा केंद्र केंद्रप्रमुख श्री. दुर्गाप्रसाद शेंडे, मुख्याध्यापिका सौ. जयश्री वाघाये, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही. टी. बन्सोड, माजी सरपंच प्रभुजी फेंडर, दुर्गा चटप, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश पेशने, उपाध्यक्ष सौ. करिश्मा बन्सोड, माजी अध्यक्ष चक्रधर शनवारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बालाराम पवनकर, पोलीस पाटील रामेश्वर वाट, माजी पंचायत समिती सदस्य संजय अहिरकर, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, सोमकांत मडामे, ग्राम पंचायत सदस्या सौ. मेघा शनवारे, सौ. दिपमाला फेंडर, सौ. जयश्री समरीत, लता समरित, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गिताताई मोटघरे, शैलेश पवनकर, अंगणवाडी सेविका ज्योती रेहपाडे, सचिन आदमने, विलास मेश्राम, भावना अहिरकर, प्रशांत पवनकर, पुष्पा चांदेकर, स्वरा मारवाडे, प्रथमेश मेश्राम तसेच माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, गावातील प्रतिष्ठित नागरीक, पालकगण व ग्रामवासी उपस्थित होते.
त्यावेळी सावित्रीबाई फुले व सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन, मार्ल्यापण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिक्षणासाठी चळवळ उभी करण्याची आवश्यकता सद्याची शिक्षण क्षेत्राचे झालेले व्यापारीकरण पाहता असं पाहायला मिळते की, ग्रामीण भागातील पालक हा आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमातून शिकविण्यासाठी आर्थिक बाजू लक्षात नं घेता स्पर्धेत उतरायचा प्रयत्न करत आहे व मराठी माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेत नं पाठवता लांब दूर शहराकडे पाठवत आहे. पालकांची मानसिकता बदलवायसाठी व आपल्या गावातील शाळेची गुणवत्ता वाढीसाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक व शिक्षक यांनी सुद्धा आपल्या मराठी शाळेचा दर्जा कसा वाढवता येईल यासाठी इतर विषयासाठी उभ्या होणाऱ्या चळवळी सारखीच शिक्षणसाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे. असे मत साहित्यीक व नाट्य अभिनेता प्रा. डॉ. शिलवंतकुमार मडामे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शाळांचा दर्जा उंचावण्याचे खरे काम शिक्षकच करतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता सीबीएसईच्या धर्तीवर सेमी-इंग्रजी शिक्षण दिले जात आहे. तसेच, राज्य शासनाने केंब्रिज विद्यापीठाशी केलेल्या करारामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अध्यापन पद्धतीचा लाभ आता ग्रामीण विद्यार्थ्यांनाही मिळेल. असे प्रखर मत पंचायत समिती सदस्य किशोर ठवकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता करनायके व प्रास्ताविक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गिताताई मोटघरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार महेश कोरचे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक केशव लेदे, गणेश गभणे, शिक्षिका सुनीता भांबोरे, पंचफुला मोहतुरे, अस्मिता तांडेकर, देव्यांशी पेशने, श्रेष्ठ समरित, यामिनी अहिरकर, सविता आग्रे व शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015