logo

दुचाकीसह दोन चोरट्यांना अटक



जळगाव : काशीनाथ चौक परिसरातून

दुचाकी चोरणाऱ्या आतिष जितेंद्र पोथीवाल (रा. कांचननगर) व गणेश लक्ष्मण कोळी (रा. साकेगाव, ता. भुसावळ) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली.

काशीनाथ चौक परिसरातून चोरट्यांनी एक दुचाकी लांबविली होती. तिचा शोध घेण्यासाठी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ. प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, प्रदीप चौधरी, गणेश ठाकरे, राहुल घेटे, योगेश घुगे यांना सूचना दिल्या. पथकाने आतिष पोथीवाल व गणेश कोळी या दोघांना अटक केले. या गुन्ह्याच्या तपासात यावल पोलिस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोकॉ. परमेश्वर जाधव, राजेंद्र पाटील यांचीही मदत झाली.

17
568 views