logo

एक दर्जेदार *एकांकिका ! नाटक ! मालिका लेखन* कार्यशाळेचा यशस्वी समारोप

एक दर्जेदार *एकांकिका ! नाटक ! मालिका लेखन* कार्यशाळेचा यशस्वी समारोप

मुंबई येथील यशवंत नाट्यमंदिरात दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी Once More Productions यांच्या वतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय *एकांकिका ! नाटक ! मालिका लेखन* कार्यशाळेचा उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने समारोप झाला. या कार्यशाळेचे मार्गदर्शन ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक व दिग्दर्शक श्री. भालचंद्र कुबल सर यांनी केले.

ही कार्यशाळा रंगभूमीवरील नवोदित कलाकार, रंगकर्मी व नाट्यरसिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली. नाट्यशास्त्र व त्यातील १९ वा अध्याय , नाटकातील आणि मालिकातील पात्र , मालिकेतील कथानक कसे तयार होते. प्रत्यक्षात लेखन कसे होते हे प्रॅक्टिकली समजून सांगितलं. चॅनेलच्या मार्कटींग पद्धत, जाहीरात व त्याचे गणित आणि कलाकार म्हणून स्वतःकडे पाहण्याची दृष्टी या विषयांवर कुबल सरांनी सखोल मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम Once More Productions या संस्थेने आयोजित केला होता. संस्थेच्या संचालिका डॉ. प्रणोती कनगुटकर यांच्या संकल्पनेतून आणि नियोजनातून हा उपक्रम साकार झाला. रंगभूमीशी निगडित दर्जेदार, मूल्याधारित आणि संस्कारक्षम उपक्रम राबवणे हे Once More Productions चे उद्दिष्ट असून, या कार्यशाळेतून ते पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

कार्यक्रमातून सहभागी विद्यार्थी कलाकारांना केवळ लेखन, रंगभुषा, प्रकाशयोजना, अभिनयाचे तांत्रिक ज्ञानच नव्हे तर रंगभूमीवरील शिस्त, वेळेचे महत्त्व आणि टीमवर्क याचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळाले. संपूर्ण कार्यक्रम वेळेच्या काटेकोर नियोजनात पार पडला, ही याची विशेष बाब ठरली.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान सहभागी विद्यार्थी कलाकारांना चाफ्याचे फूल, एक वही पेन तर मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थी मित्रांना सहभाग प्रमाणपत्र तर काही मान्यवर मंडळींना भेट म्हणून वन्स मोर प्रॉडकशन ची अधिकृत डायरी वितरण करण्यात आले. या छोट्या पण अर्थपूर्ण उपक्रमांमुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक आणि भावनिक स्पर्श मिळाला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे पडद्यामागील टीमचे मोठे योगदान होते. निवेदन आणि समन्वयाची जबाबदारी मयुरेश चंद्रकांत शिंदे, शिल्पा मेस्त्री , पार्थ आणि पियुष कानगुटकर यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या संयोजनामुळे कार्यक्रमात कुठेही गोंधळ न होता सर्व काही सुरळीत पार पडले.

या कार्यशाळेसाठी लाभलेले मान्यवर पाहुणे विवेक देशपांडे, हेमंत सुहास भालेकर सर आणि उदय दरेकर सर यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. त्यांनी कार्यशाळेबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले आणि विद्यार्थी कलाकारांना मार्गदर्शन ही केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मान्यवर, विद्यार्थी , रसिक श्रोतो वर्ग यांनी आयोजक टीमचे विशेष कौतुक केले आणि अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

या संपूर्ण कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल यशवंत नाट्यमंदिर व्यवस्थापनाचे तसेच सर्व शिबिरात आलेलं सर्व विद्यार्थी मित्रांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

अशा प्रकारचे दर्जेदार आणि संस्कारक्षम उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवले जातील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
991 views