
जिल्हा परिषद शाळा बोदा येथे जयंती साजरी
*जि प शाळा बोदा येथे संत रविदास महाराज जयंतीवर शैक्ष. साहित्य वाटप*
तिरोडा:- पं स तिरोडा अंतर्गत गोंडमोहाडी केंद्रातील जि प उ प्राथ शाळा बोदा येथे दि 1 फेब्रुवारी 2026 रविवारला संत शिरोमणी रविदास महाराज जयंती निमित्ताने *एकता मार्गदर्शन सेवाभावी संस्था ,गोंदिया व निखिल गिरधारी खरोले माजी विद्यार्थी बोदा* यांचे कडुन जि प शाळा बोदा येथिल 115 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटुन दानधर्माच्या उद्दात्त हेतुने संतांंच्या चरणी श्रध्दासुमन वाहिले.
सदर प्रसंगी माजी पं स सदस्या सौ. मायाताई भगत यांनी अध्यक्ष स्थान तर शा व्य स अध्यक्षा सौ. सिमाताई चौधरी, श्रीमती भुमेश्वरी राणे, श्री राजकुमार बिलोने, श्री बेनिरामजी बारेवार , श्री छोटेलालजी पारधी उपसरपंच, श्री योगराज जी बारेवार माजी अध्यक्ष, श्री अनिल पटले , श्री रामेश्वर बारेवार , श्रीमती लक्ष्मीताई पारधी! श्रीमती आशाताई बिसेन , श्रीमती रेश्माताई राऊत अशा अनैक पालकांनी प्रमुखपाहुणे म्हणुन भुमिका पार पाडली
*विशेष अतिथी* *सौ शर्मिला गजभिये* (अध्यक्ष, एकता मार्गदर्शन NGO गोंदिया) श्री राकेश गजभिए उपसचिव, श्री राकेश पटले सदस्य ,श्री मनिष बोरकर सदस्य , कु प्रिया हरडे csc विहान कोआर्डीनेटर, *निखिल गिरधारी खरोले* ( माजी विद्यार्थी बोदा) यांनी शाळेत शिकणार्या 115 व माजी विद्यार्थी 27 अशा *142 विद्यार्थ्यांना परिक्षा पॅड, खोडरबर, पेन्सिल, टाॅय ,रिबिन व कम्पास पेटी तसेच शिक्षकांना डायरी व पेन* वाटप करुन संत जयंती साजरी केली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद चन्ने यांचे उत्तम कार्य पाहुन NGO आणि दानादात्यांनी विद्यार्थ्यांकरिता उचलेले उद्दात्त पाऊल खरचं जि प शाळेला नवजीवन देण्याचे काम करीत आहे, अशी चर्चा पालक-नागरिक करत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री विनोद चन्ने तर सुत्रसंचलन कु देविता पारधी तसेच कार्यक्रमाचे नियोजन सौ सरिता पारधी व कु शेजल बारेवार यांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने केले तर पराग शहारे यांनी आभार मानुन सर्वांना धन्यवाद दिला. शालेय पोषणआहार कर्मचारी सौ शहारे बाई व श्रीमती पारधी बाईंनी कार्यक्रम यशस्वी करण्यात सुट्टीचा दिवस असुन देखील पुर्णवेळ सहकार्य दिल्याने *सरपंच श्री सुनिलजी नागदेवे* आणि समितीं सदस्यांनी त्यांची प्रशंसा केली.