logo

स्वराज्याच्या छत्रपती उदयनराजे भोसले दुसरे छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले सर्व पक्षीय आमदार खासदारानी स्व अजित पवाराना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधन झाले यानिमित्त आयोजित शोकसभेस उपस्थित राहून दादांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
त्यांच्या आठवणींना उजाळा देत, समाजकारण, नेतृत्व आणि कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते यावेळी स्मरणात ठेवले गेले.
दादांचे विचार, कार्य आणि संघर्षमय जीवन अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.
याप्रसंगी नामदार श्री.शंभूराज देसाई, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार श्री.नितीन पाटील, आमदार श्री.शशिकांत शिंदे, आमदार श्री.मनोज घोरपडे, माजी आमदार श्री.बाळासाहेब पाटील, माजी आमदार श्री.आनंदराव पाटील, माजी आमदार श्री.दीपक चव्हाण तसेच विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0
877 views