नाशिकमध्ये भाजप मंत्री गिरीश महाजनच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव (वनरक्षक) महिलेसोबत फोनवर बोललो. - अँड. प्रकाशजी आंबेडकर
*प्रजासत्ताकदिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाव घेतले नाही म्हणून नाशिक मध्ये वन विभागाच्या एका महिला अधिकारी यांनी गिरीश महाजन यांना जाब विचारला आणि मला सस्पेंड केलं तरी चालेल पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन करणार नाही असे ठणकावून सांगितले त्यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो.आज नाशिकमध्ये भाजप मंत्री गिरीश महाजनच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव (वनरक्षक) महिलेसोबत फोनवर बोललो. यावेळी माधवी जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला सांगितला. मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्य अट्रोसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल.आरएसएस-भाजपाकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय. भाजप आणि गिरीश महाजनच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.: ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.