logo

क्युरिओसिटी स्कूलमध्ये 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा...

सांगवी येथील क्युरिओसिटी स्कूलमध्ये 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन केला उत्साहात साजरा. यावेळी सर्व प्रथम उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस आदर्श गृहीणी तथा प्रमुख पाहुणे सौ. राजश्री पाथरकर यांच्या हस्ते तर आदरणीय निलकंठ डुमणे व प्रसेंजित वाघमारे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे हार अर्पण करण्यात आला. उज्वल अकॅडमी व क्युरिओसिटी स्कूल चे संचालक तथा लोकहित लाईव्ह न्यूजचे नांदेड शहर प्रमुख प्रा.माधव खिल्लारे यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करून ध्वजारोहण केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका तथा संचालिका सौ आशा खिल्लारे ह्या होत्या. सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे पूष्पगूच्छ देवून सत्कार करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्य विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस म्हणून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले शाळेच्या चिमुकल्यांनी विविध महापूरूषाच्या वेशभूषेत सादरीकरण करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला . आपल्या भाषणातून महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. राजश्री पाथरकर यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देवून आज या ठिकाणी प्रमूख पाहुणे म्हणून मिळालेला मान ही एक भारतीय संविधानाची देणं आहे असे त्या म्हणाल्या.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.खिल्लारे यांनी आपल्या भाषणात संविधान निर्मात्याला शतशः नमन करून संविधानाचे महत्व आपल्या जीवनात किती आहे हे पटवून दिले त्यानंतर संचालक प्रा.माधव खिल्लारे यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व उपस्थितांचे शब्द सुमनानेस्वागत केले . याप्रसंगी प्रमुख पाहुणे निलकंठ डुमणे, प्रसेंजित वाघमारे,माधव केळकर व सांगवी परिसरातील असंख्य नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंजली मिस, मोहीनी मिस, सोनिया मिस, अंकिता मिस व गितांजली मावशी यांनी परिश्रम घेतले.

4
725 views