logo

भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पद तसेच पुणे जिल्हाध्यक्ष व इतर पदांची नेमणूक करण्यात आली.

26/01/26 वार सोमवार JPI भवन भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कार्यालयात संविधान दिवस आणि गणतंत्र दिवस निमित्त खास विशेष पदांची आज नेमणूक करण्यात आली. त्यात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी श्री प्रवीण भानुदास घेमूड यांची नेमणूक करण्यात आली. तसेच पुणे जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षपदी श्री लक्ष्मण शरद मल्लाव व सचिन मल्लाव यांची पुणे ज़िल्हा युवा अध्यक्ष मोर्चा पदी नेमणूक करण्यात आली व शिरूर तालुक्यातील सरचिटणीस पदी श्री माधव सल्ले व नितीन पवार यांची नेमणूक केली.सर्व पद ग्रहण केलेल्या कार्यकर्त्यांनी एकता व अखंडता संविधान वाचवण्याची शपथ JPI कार्यालयात घेतली. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी आपले भाषणात सांगितले की माझी जनसेवा ही ईश्वर सेवा मानतो.त्यांनी सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ता यांचे आभार व्यक्त केले. व त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा.. 💐💐💐💐💐💐💐💐💐

0
1357 views