logo

महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेचा निधी अडकल्याने हजारो मजुरांची उपासमारीची वेळ वैयक्तिक लाभाची मजुरी २ महिन्यांपासून प्रलंबित – शासनाची गंभीर उदासीनता..


दिनांक : 26/01/2026
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील हजारो मजुरांची वैयक्तिक लाभाची मजुरी गेल्या दोन महिन्यांपासून मंजूर व जमा न झाल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.
तालुका व जिल्हा स्तरावर सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन FTO तयार व पुढे पाठवलेले असतानाही PFMS–SPARSH प्रणालीत निधी अभावी मजुरांच्या खात्यावर पैसे जमा होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. शासनाच्या या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब मजूर, शेतकरी व कुटुंबे अन्न, औषधोपचार व शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
महागाईच्या काळात मजुरी वेळेवर न मिळाल्याने अनेक मजुरांवर कर्जबाजारीपणा, उपासमार व स्थलांतराची वेळ आली आहे. रोजगार हमी योजनेचा उद्देशच फोल ठरत असून, ही बाब थेट मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
तरी शासनाने तातडीने:
राज्य खात्यात निधी उपलब्ध करावा
प्रलंबित सर्व FTO त्वरित मंजूर करून मजुरी जमा करावी
PFMS–SPARSH तांत्रिक अडथळे त्वरित दूर करावेत
अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन, मुख्यमंत्री व मुख्य सचिवांकडे थेट तक्रारी, तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मजूर संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
ही बाब केवळ प्रशासकीय नाही तर गरिबांच्या पोटाशी संबंधित असल्याने शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

4
3496 views