logo

जळगां जिल्हा राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यक साहित्य वाटप शिबिर संपन्न.

जळगाव जिल्हा राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यक साहित्य वाटप शिबिर संपन्न झाले.
पाचोरा प्रतिनिधी :-
जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी
दि. 23 जानेवारी, 2026
एरंडोल, जळगाव

सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार यांच्या राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत तसेच भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO), मुंबई, जिल्हा प्रशासन जळगाव व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त सहभागातून एरंडोल येथे सहाय्यक साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.

जिल्ह्यात सदर योजनेची प्रथमच अंमलबजावणी करण्यात येत असून, वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांना दैनंदिन जीवन अधिक सुलभ व स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

आजच्या शिबिरात –
एकूण 550 वयोवृद्ध लाभार्थ्यांना
सुमारे 50 लाख रुपये किमतीचे सहाय्यक साहित्य वाटप करण्यात आले.

उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्यामध्ये –
व्हील चेअर, कमोड चेअर, कर्णयंत्र, कृत्रिम दात, चष्मे, कमरेचे पट्टे, गुडघ्याचे पट्टे, मानेचे पट्टे, काठी इत्यादी 15 प्रकारचे साहित्य गरजेनुसार वितरित करण्यात आले.

जळगाव जिल्हृयातील 8 तालुक्यांतील सुमारे 6000 पात्र लाभार्थी निश्चित करण्यात आले असून, तालुकानिहाय शिबिरांच्या माध्यमातून एकूण सुमारे 6 कोटी रुपये किमतीचे साहित्य वाटप करण्यात येत आहे.

आजच्या कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभली
मा. श्रीमती स्मिता ताई वाघ, लोकसभा सदस्य, जळगाव लोकसभा मतदार संघ
उप विभागीय अधिकारी, एरंडोल
नगराध्यक्ष, एरंडोल नगरपरिषद, डॉ. नरेंद्र ठाकूर
श्री. एस. पी. गणेशकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र
डॉ. किरण पावरा, ALIMCO मुंबई

समाजातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बंधू-भगिनींच्या सन्मानपूर्वक व स्वावलंबी जीवनासाठी प्रशासन कटिबद्ध असून, अशा लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे.

0
46 views