logo

शिरूर शहरातील 25 कोटीचा तस्करी करणारा अहिल्यानगर मधील पोलीस कर्मचारी श्याम सुंदर गुजर याला अटक

दिनांक.22/01/25 वार्ताहर. अनिल मल्लाव पुणे
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारा पोलीस कर्मचारी श्याम सुंदर विश्वनाथ गुजर बक्कल नंबर 2207 हा खाकी वर्दीतला असल्याचं उघड झाले असून पुणे पोलिसांनी पहाटे चार वाजता त्याला अटक केली पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गॅरेज चालक शादाब रियाज शेख वय 41 राहणार शिरूर याला एक किलो 52 ग्रॅम एमडी ड्रग्स सह अटक करण्यात आली. पोलीस चौकशीत हा 25 कोटीचा एमडी ड्रग्स थेट सप्लाय करणारा अहिल्या नगर मधील पोलीस खात्यातील LCB तील पोलीस कर्मचारी श्याम गुजरने पुरवल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणामुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली. या कार्यामुळे जनतेतून पोलिसांबद्दल कौतुक होत आहे.

7
546 views