logo

शासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष मुळे तालुक्यात अतिक्रमणांचे वाढ व गौण खनिज चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत तरी शासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष

मौजे जोडगव्हान ता. मालेगांव जि. वाशिम येथील गट नं. १०९ मध्ये २ हे. ५० आर. शेतजमीन असून, माझ्या शेतीच्या पुर्वेकडून जोडगव्हान ते शिव रस्ता आहे व त्यानंतर किन्हीराजा ते वाशिम राज्य महामार्ग रस्ता आहे. तसेच माझ्या शेताच्या उत्तरेकडून तोरणाळा ते जोडगव्हान सरकारी डांबर रस्ता आहे. तसेच माझ्या शेताच्या पश्चिमेकडून प्रल्हाद चव्हाण यांची शेतजमीन आहे. तसेच दक्षिणेकडून देवानंद आकाराम चंद्रशेखर यांची शेतजमीन आहे.

२. वर नमुद गैरअर्जदार यांची मौजे तोरणाळा गट नं. २३१ मध्ये ०.४१ है. आर. शेतजमीन आहे. त्यांच्या शेताच्या पश्चिमेकडून किन्हीराजा ते वाशिम राज्य महामार्ग हा सरकारी रस्ता आहे. सदरहू महामार्गाच्या पश्चिमेकडून जोडगव्हान ते गुंज शिव रस्ता आहे. सदरहू गट नं. २३१ चे कोणतेही क्षेत्र किन्हीराजा ते वाशिम राज्य महामार्गाच्या पश्चिमेकडून नाही याची संपूर्ण जान गैरअर्जदारांना आहे. परंतु गैरअर्जदार हे जाणीवपूर्वक त्रयस्थ लोकांना ज्याच्या सरकारी शिवरस्त्याच्या जागेशी कोणताही हकक व संबंध नाही, अशा लोकांना बेकायदेशीररित्या ५००/- रूपयाच्या स्टॅम्पपेपरवर मालकी हक्क ताब्याचा करारनामा लिहून देवून गैरकायदेशीर दस्त तयार करून देवून त्यांची कोणतीही मालकी व ताबा नसतांना सरकारी जागेवर इतर लोकांना सरकारी जागा स्वतःच्या मालकीची जागा दर्शवून खोटे बेकायदेशीर दस्त करून देत आहेत. त्यामुळे सदरहू रस्त्यावर लोक अतिक्रमण करून माझ्या शेताच्या पूर्वेकडील भाग अतिक्रमण करून बंद करू पाहत आहे. सदरहू बेकायदेशीर कृत्य करून इतर लोकांना सहकार्य करण्याच्या हेतूने व गैरकायदेशीर लाभ मिळण्याच्या वाईट हेतूने स्वतःची शेतजमीन किंवा जागा नसतांना सुध्दा सरकारी जागेचे खोटे व्यवहार करून लोकांना अतिक्रमण करण्यास प्रवृत्त करीत आहेत व त्यांना सहकार्य करत आहेत. वर नमुद लोकांनी रस्त्यावर आज सकाळी ७.०० वाजताच्या दरम्यान अतिक्रमण करून मुरूम टाकण्यास सुरूवात केली त्यावेळी नी सदरहू लोकांना म्हटले की, रस्त्यावर मुरूम टाकून पोल का रोवत आहेत असे म्हटले असता, गैरअर्जदार E

यांनी सदरहू जागा ही आमच्या मालकीची आहे, तुमच्याने काय होईल ते करून घ्या, आमच्या मधात आले तर जिवाने मारून टाकील, असे म्हणून गैरअर्जदार लोक डे जाणीवपूर्वक माझ्या शेताच्या वहितीला पुर्वेकडील असलेल्या शिव रस्त्याला अडथळा निर्माण करून वहिवाटीला अडथळा निर्माण करीत आहेत. घर उमुद गैरअर्जदार लोक हे गुंड प्रवृत्तीचे असून, त्यांचा गावामध्ये जोडजमाव आहे तसेच त्यांचा राजकीय लोकांशी परिचय असून, ते केंव्हा काय करतील याचा नेम नाही. तसेच त्यांच्यापासून माझ्या जिवात्वास तसेच माझ्या कुटुंबियांच्या जिवीतास धोका निर्माण झालेला आहे. वरील प्रमाणे गैरअर्जदारांनी कोणतेही कायदेशीर मालकीहक्क नसतांना किन्हीराजा वाशिम राज्य महामार्गावरील पश्चिम बाजूची, माझ्या शेताच्या पूर्वेकडील शिवरस्त्यालगतची सरकारी जागा रू. ५००/- च्या बॉन्डपेपरवर नोटरी करून विकल्याचा करारनामा केला आहे. तरी गैरअर्जदारांविरूध्द गुन्हे नोंदविण्यात यावे आणि अशा परिस्थीतीमध्ये त्यांच्याविरूध्द कडक कार्यवाही करण्यात यावी व रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे
.

1
2665 views