logo

रिसोड नगर परिषद आरोग्य सभापती संतोष चराटे बांधकाम सभापती माधुरी स्वप्निल इरकर तर महिला बालकम सभापती जया अमोल नकवाला व पाणीपुरवठा सभापती संजय बगडिया

रिसोड : नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी २० जानेवारी रोजी झालेल्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपच्या तीन तर शिंदेसेनेच्या एका नगरसेवकाची सभापतीपदी निवड झाली आहे.

रिसोड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे भगवानराव क्षीरसागर नगराध्यक्षपदी तर विष्णू कदम पाटील उपाध्यक्षपदी निवडून आल्यानंतर सभापतीपदाच्या निवडीकडे लक्ष लागले होते. त्यानुसार २० जानेवारी रोजी विषय समिती सभापतींच्या निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये भाजपच्या माधुरी स्वप्निल इरतकर यांची बांधकाम समितीच्या सभापतीपदी, तर शामली सागर डांगे यांची बांधकाम समितीच्या उपसभापतीपदी निवड झाली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी जया नकवाल, तर पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी संजय बगडिया यांची वर्णी लागली आहे. शिंदेसेनेच्या संतोष चऱ्हाटे यांची आरोग्य व शिक्षण समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली. सध्याच्या नगरपरिषदेत भाजपचे ९, काँग्रेसचे ८, शिंदेसेनेचे ५ तर १ अपक्ष नगरसेवक आहेत. या निवडणुकीसाठी संजय नागटिळक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर सतीश शेवदा यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सभापतींच्या समर्थकांनी फटाके फोडून, आतषबाजी व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शहराध्यक्ष सागर डांगे व महामंत्री संदीप गुंजकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0
6 views