
घोडेगावकडे ‘चलो’चा नारा; महाविजय निर्धार सभेचे आयोजन
घोडेगावकडे ‘चलो’चा नारा; महाविजय निर्धार सभेचे आयोजन
घोडेगाव | प्रतिनिधी अमोल पोखरकर
पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर पारगाव तर्फे अवसरी बु. (बुद्धक–जारकरवाडी) जिल्हा परिषद गटातून मा. श्री. विवेक प्रतापराव वळसे पाटील, तसेच पंचायत समिती गणातून सौ. सुनंदा निवृत्ती ढोबळे–गवारी आणि जारकरवाडी पंचायत समिती गणातून कु. अंकिता अनिल वाळुंज यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर ‘चलो घोडेगाव’ असा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मोरया मंगल कार्यालय, निरगुडसर फाटा, मेंगडेवाडी येथे महाविजय निर्धार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर विकासकामांना गती देणे, तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी ‘चला फॉर्म भरायला, विकास गतिमान करायला’ असा संदेश या निर्धार सभेमधून देण्यात येणार आहे.
दरम्यान, संजय शेठ दिगंबर पोखरकर, माजी सरपंच वडगावपीर यांनी उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून, विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
संबंधित गट व गणातील नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी व विकासप्रेमींनी या महाविजय निर्धार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.