logo

स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालय, धोडप बु. येथे क्रीडा सप्ताह उद्घाटन संपन्न..

स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालय, धोडप बु. येथे क्रीडा सप्ताह उद्घाटन संपन्न.....
शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी गोडी निर्माण व्हावी तसेच खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षी क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते त्याचप्रमाणे याही वर्षी दिनांक 20 जानेवारी 2026 ते 25 जानेवारी 2026 पर्यंत विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सज्जनराव बाजड सर प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव संतोषराव गायकवाड साहेब यांच्या शुभहस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून क्रीडा सप्ताहाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने क्रिकेट, कबड्डी, खोखो, संगीत खुर्ची, धावणे, लंगडी इत्यादी खेळाचे आयोजन क्रीडा शिक्षक प्रवीण जमधाडे यांनी क्रीडा सप्ताह शिस्तीत पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करून शिस्त व नियमात पार पाडण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन केले आहे . क्रीडा सप्ताहामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप भिसडे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रवीण जमधाडे यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.

46
1588 views