logo

चिन्मय मिशनतर्फे गीता ज्ञानयज्ञाचे आयोजन


नांदेड दि. 19 -
येथील चिन्मय मिशन व श्री गणपती मंदिर, भाग्यनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 22 ते 26 जानेवारी दरम्यान श्रीमद् भगवतगीता ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6-30 ते 8 या वेळेत गणपती मंदिर, भाग्यनगर येथे संपन्न होणार्‍या सदरील गीता ज्ञानयज्ञात चिन्मय मिशन शाखा नांदेडचे प्रमुख प.पू. स्वामी प्रत्ययानंदजी सरस्वती यांच्या अमृतवाणीतून अक्षर ब्रह्मयोग या विषयावर भाविकांना कथा श्रवणाचा लाभ मिळणार आहे. तसेच दि. 23 ते 26 जानेवारी दरम्यान सकाळी 7-15 ते 8-15 या वेळेत निर्वाणषटकम या विषयावर विवेचन होणार आहे.
तरी भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिन्मय मिशन शाखा नांदेडचे अध्यक्ष भीमराव रामीनवार, उपाध्यक्ष विनय बारडकर, सचिव अनंत करडखेडकर, कोषाध्यक्ष सुभाष व्यवहारे यांनी केले आहे.

0
0 views