
कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन ला आज वर्ष पूर्ण झाले
कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन १८जानेवारी २०२५ ला सुरूवात केली होती आज एक वर्षात कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन ही संस्था महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोहचली आहे तसेच गुजरात मध्यप्रदेश राजस्थान व दिल्ली येथे सुध्दा संस्थेचे पदाधिकारी जाँईन झाले आहे यासाठी तुम्ही सर्वांनी मिळून केलेल्या उल्लेखनीय कामगिरी योगदानामुळेच शक्य झाले आहे आपल्या सर्वांना कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आजचा कार्यक्रम हा आपण पुढच्या महिन्यात १५फ्रेबुवारी २०२६ रविवार महाशिवरात्री दिवशी प्रसाद मंगल कार्यालय गंगापूर रोड नाशिक येथे आयोजित केला आहे मागील वर्षी पेक्षा यंदा संस्था ९००पेक्षा जास्त पदाधिकारी व सदस्य कार्यरत झाले आहे पुढच्या वर्षी ही संस्था भारतभर पसरली पाहिजे यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो
आजपर्यंत आपण सर्वांनी मिळून खुप छान उपक्रम राबविले आहेत अनेक ठिकाणी उपक्रम माध्यमातून संस्था प्रसाशन तथा जनसामान्यांच्या मनात पोहचली आहे त्याचे श्रेय फक्त आणि फक्त तुम्हाला सर्वांना आहे त्यामुळे प्रत्येक सदस्याचे मनापासून हार्दिक अभिनंदन व आभार
यावर्षाभरात अनेक पदाधिकारी इच्छा असूनही ॲक्टीव झाले नाही त्यांनी १५ फ्रेबुवारी रोजी कार्यक्रम मध्ये सहभागी व्हावे आणि जबाबदारी संपूर्णपणे घ्यावी ही नम्र विनंती करतो
सर्वांना हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही जाहीर आवाहन करतो ही संस्था नसून हा आपला परिवार आहे
यादिवशी आपण राष्ट्रीय अध्यक्ष निवडणार आहे मी एक वर्षात संस्था ०पासुन सुरू केली होती आज तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पाठवळावर ९००पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे त्यामुळे मी ही जबाबदारी नवीन पदाधिकारी ला देणार आहे आपल्या मधून कोण कोण पुढे येते बघू राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी मी स्वागत करेल व माझ्या कडून सर्व सहकार्य करेल
पुन्हा एकदा आपल्या सर्वांना संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा व सर्वाचे मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
आपला
सुनिल परदेशी