logo

*अंनिस कार्य गुणगौरव पुरस्काराने ग्यानचंद जांभूळकर सन्मानित* विलास केजरकर भंडारा.

प्रेस नोट
भंडारा

*अंनिस कार्य गुणगौरव पुरस्काराने ग्यानचंद जांभूळकर सन्मानित*
विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा भंडारा तसेच अभाअंनिस तालुका शाखा साकोली यांच्या संयुक्त विद्यमानाने दुर्गाबाई डोह कुंभली येथे दोन दिवशीय शिबिरात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष ग्यानचंद ताराचंद जांभूळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमध्ये मोलाचे योगदानाबद्दल अंनिस कार्य गुणगौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मदन बांडेबुचे होते. उद्घाटन साकोली येथील पोलीस विभागीय अधिकारी शिवम इसापूरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून साकोली येथील पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, गोंदिया जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे, उज्वल व्यसनमुक्ती केंद्र संचालिका उषा घोडेश्वार, जिल्हा संघटक रत्नाकर तिडके, जिल्हा सचिव मूलचंद कुकडे, राज्य संघटना अध्यक्ष रामभाऊ येवले, महिला संघटन प्रियाताई शहारे, कार्याध्यक्ष, प्रा. अशोक गायधने, महिला संघटिका कीर्ती गणवीर, तालुका संघटक शितल नागदेवे, कागदराव रंगारी, सचिव यशवंत उपरीकर, महिला संघटिका कल्पना सांगोडे, तालुका महिला अध्यक्ष वनिता बहेकार तालुकाध्यक्ष बि. एल. मेश्राम, पंचायत समिती सदस्य अनिल किरणापुरे, सामाजिक कार्यकर्ता चुन्निलाल वासनिक, माजी सभापती रेखा वासनिक, गोस्वामी सर, छायाताई चव्हाण, विशाल तायडे, प्रेमलाल लांजेवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
ग्यानचंद ताराचंद जांभुळकर हे २००२ पासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला जुळले व तेव्हापासून अविरत त्यांचे कार्य चालू आहे. २००२ मध्ये त्यांनी मोहाडी तालुका शाखा स्थापन केली होती. त्या शाखेमध्ये रेकॉर्ड ब्रेक सदस्यांची सहभागी झाले होते. व जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी शाखा मोहाडी होती. त्यानंतर २०११ मध्ये त्यांना जिल्ह्याचे उपाध्यक्ष पद देण्यात आले. तेव्हापासून ते उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीवा वाढाव्या म्हणून त्यांनी आजपर्यंत २०० शाळांमध्ये कार्यक्रम केलेले आहेत. त्याचप्रमाणे जवळपास १००० गावांमध्ये सामाजिक प्रबोधनाचे कार्य केलेले आहे. त्यांची एक टीम असून त्या टीम च्या सहकार्याने गावोगावी जातात संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज संत तुकाराम महाराज, फुले शाहूआंबेडकर, मा जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, रमाई यांच्या विचारधारेवर सामाजिक प्रबोधन करतात.
जिल्ह्यामध्ये काही जादूटोणाच्या घटना घडल्यास ते संपूर्ण टीमसह तिथे जाऊन ९ ते १० बुवा बाबांचा भंडाफोड करतात. नकली बाबांचा भांडाफोड केलेला आहे. प्रबोधन करताना ते म्हणतात की, जगामध्ये भूत, भानामती लावडीन, चेटकिन नाही. जगामध्ये मंत्र तंत्र जादूटोणा नाही. जगातील मांत्रिकांना ते आव्हान करतात की, भाजलेला पापड मंत्राने किंवा जादूने पापडाला स्पर्श न करता मोडून द्यावे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ८० लाख रुपयाची बक्षीस जिंकावे.
आज पर्यंत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ५०० नकली बुवा बाबांचे भांडाफोड केलेले आहे. काही बाबांनी माफी मागितली त्यांना सोडून दिले. पण ज्या नकली बाबांनी माफी मागितली नाही त्यांना तुरुंगवास झालेला आहे. आजपर्यंत कोणत्याही नकली बुवा बाबांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ८० लाख रुपये जिंकण्याची आव्हान स्वीकारलेले नाहीत .कारण ह्या जगामध्ये अशा गोष्टी अस्तित्वात नाही. फक्त विज्ञान आहे व संत आणि महापुरुष यांचे विचार स्वीकारून लोकांनी आपले जीवन पद्धती बदलायला पाहिजे.
ग्यानचंद जांभुळकर शाळेमध्ये किंवा गावांमध्ये जाऊन वैज्ञानिक प्रयोग सादर करतात जसे की हातावर कापूर जाळणे व ते जिभेवर घेणे, नारळातून वस्तू काढणे, लिंबूतून वस्तू काढणे, लिंबूतून रक्त काढणे, सायकलचे स्पोक जिभेला टोचणे, तांदळाने भरलेला तांब्या चाकूने उचलणे हा भूत काढण्याचा प्रयोग आहे. कानाला चिठ्ठी लावून चिठ्ठी मधले नाव ओळखणे, रुमालची गाठ सोडणे इत्यादी प्रयोग ते मनोरंजनाच्या माध्यमातून करतात व लोकांचे प्रबोधन करतात.
सभेचे सुत्रसंचालन तालुका अध्यक्ष भाऊराव मेश्राम यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव यशवंत उपरीकर यांनी मानले.
अंनिसचे सक्रिय कार्यकर्ते ग्यानचंद जांभूळकर यांना अंनिसचा गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. वामन तुरिले, विलास केजरकर, समीर नवाज, राहुल मेश्राम व त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
46 views