logo

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष उपस्थित राहणार ‌‌

७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून युरोपीय कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कॉस्टा आणि युरोपीय कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेयेन उपस्थित राहणार आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आमंत्रण स्वीकारुन हे दोघे ३ दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत.

या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून द्विपक्षीय चर्चा करतील.

२७ जानेवारीला आयोजित भारत युरोपीय संघ शिखर परिषदेचं अध्यक्षपद ते संयुक्तपणे भूषवतील.

13
1764 views