logo

जळगावकरांनी दाखवला बंडखोरांना घरचा रस्ता

२०१८ च्या निकालाची पुनरावृत्ती : राजकीय भवितव्यही संकटात

जळगाव : महानगरपालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने दंड थोपटून मैदानात उतरलेल्या बंडखोरांना मतदारांनी धक्का दिला आहे. भाजप आणि शिंदेसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात शहू ठोकणाऱ्या सर्वच बंडखोरांचा या निवडणुकीत दणदणीत पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, २०१८ प्रमाणेच यंदाही एकाही बंडखोराला विजयाची चव चाखता आलेली.

निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिंदेसेनेमध्ये उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच झाली होती. अनेकांनी पक्ष डावलल्याच्या रागातून अपक्ष किंवा इतर पर्यायांच्या माध्यमातून निवडणूक लढवली.

मात्र, जळगावकरांनी केवळ पक्षीय चिन्हांना पसंती दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. या निकालात यामध्ये जितेंद्र मराठे, स्वप्नील परदेशी, रंजना सपकाळे, चेतन सनकत, भरत कोळी, प्रमोद शिंपी, हर्षदा सांगोरे या सर्व बंडखोर उमेदवारांचा या निवडणुकीत पराभव झाला.

बंडखोरांचा प्रभाव नगण्य

जळगाव महापालिकेच्या राजकारणात बंडखोरांना थारा मिळत नाही, हे या
निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही अनेक दिग्गजांनी बंडखोरी केली होती; मात्र त्यावेळीही एकालाही यश मिळाले नव्हते. 'पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही,' असा स्पष्ट संदेश जळगावच्या मतदारांनी दिला आहे. बंडखोर उमेदवार महासतीच्या अधिकृत उमेदवारांची मते विरोधकांना होईल असा अंदाज होता. मात्र, निकाल पाहता महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनी मोठ्या
मताधिक्याने विजय मिळवला असून बंडखोरांचा प्रभाव नगण्य ठरला आहे.

मतमोजणी आटोपल्यावर विजेत्या नगरसे मानसी

7
541 views