३८ गुन्हे दाखल असलेला कुख्यात "घरफोडी मास्टर" रमेश पकडला ...
प्रेस नोट
अहिल्यानगर
३८ गुन्हे दाखल असलेला कुख्यात "घरफोडी मास्टर" रमेश पकडला ...
नगर (शिवप्रहार न्यूज) - या बातमीची हकीगत अशी की, दिनांक 13/12/2025 रोजी सायंकाळी 06.00 वा ते दिनांक 16/12/2025 रोजीचे 12/00 वा.चे दरम्यान फिर्यादी हे कुटुंबासह जयपुर येथे नातेवाईकांचे कार्यक्रमास गेले होते.त्यादरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे राहते घराच्या मागील दरवाजाचे लॅाक कशानेतरी तोडुन आत प्रवेश करुन घरामध्ये ठेवलेले 14,75,000/-रु किमतीचे सोने, डायमंड, चांदी व रोख रक्कम चोरुन नेले आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी श्री अशोककुमार विजयकुमार अग्रवाल,रा. बंगला क्र.06 विराज कॉलनी, सावेडी, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 1191/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(3), 331(4), 305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर शहरामध्ये घरफोडीचे गुन्हे करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते. सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार, रविंद्र पांडे, सुरेश माळी, गणेश धोत्रे, शाहिद शेख, फुरकान शेख, दिपक घाटकर, बिरप्पा करमल, सतिष भवर, रोहीत येमुल, अमृत आढाव, प्रकाश मांडगे, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे, चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते.
नमुद पथकाने गुन्ह्यातील आरोपींबाबत गोपनीय माहिती व व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती संकलित करुन आरोपीचे शोध घेत असतांना पथकास सदरचा गुन्हा रमेश कुंभार रा. वर्तनगनर ठाणे याने केले असल्याची माहिती मिळाली. दिनांक 16/01/2026 रोजी पथकाने नमुद आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव 1) रमेश महादेव कुंभार वय 49 रा. अमाप रेसीडेन्सी, फलॅट नं.203, कशेळी, ठाणे असे असल्याचे सांगितले त्यास वरील गुन्हे बाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा मी व माझे साथीदार 2) आशीष शिंदे रा. बारामती ता.बारामती जि. पुणे (फरार) अशांनी मिळुन केल्याची कबुली दिली आहे.
त्यानंतर ताब्यातील आरोपीचे ताब्यातुन व आरोपीचे सांगणे प्रमाणे 15,11,475/- रु कि.ची 104.670 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, 4,00,000/- रु की.ची मारुती सुझुकी कंपनीची SX4 मॉडेलची कार, 31,000/- रु की.चे सिल्व्हर रंगाचे मोठे 31 मोती, एक कटर, मोठे कटर असा एकुण 19,42,475/- रु कि.चा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी नामे रमेश महादेव कुंभार हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ. क्र.पोलीस ठाणे ,गु.र.नं. व कलम
1 कोथरुड जि.पुणे शहर 182/2014 भा.द.वि.कलम 454,457,380
2 कोथरुड जि.पुणे शहर 04/2014 भा.द.वि.कलम 454,457,380
3 कोथरुड जि.पुणे शहर 102/2009 भा.द.वि.कलम 454,457,380
4 कोथरुड जि.पुणे शहर 42/2014 भा.द.वि.कलम 454,457,380
5 कोथरुड जि.पुणे शहर 526/2013 भा.द.वि.कलम 454,457,380
6 कोथरुड जि.पुणे शहर 166/2014 भा.द.वि.कलम 454,457,380
7 दत्तवाडी/पार्वती जि.पुणे शहर 335/2014 भा.द.वि.कलम 454,457,380
8 कोथरुड जि.पुणे शहर 521/2014 भा.द.वि.कलम 457,380
9 कोथरुड जि.पुणे शहर 139/2014 भा.द.वि.कलम 454,457,380
10 कोथरुड जि.पुणे शहर 93/2014 भा.द.वि.कलम 457,380,34
11 कोथरुड जि.पुणे शहर 406/2014 भा.द.वि.कलम 457,380
12 कोथरुड जि.पुणे शहर 366/2003 भा.द.वि.कलम 454,457,380,34
13 कोथरुड जि.पुणे शहर 50/2005 भा.द.वि.कलम 379,34
14 कोथरुड जि.पुणे शहर 715/2024 भा.द.वि.कलम 454,457,380,34
15 कोथरुड जि.पुणे शहर 04/2014 भा.द.वि.कलम 454,457,380
16 कोथरुड जि.पुणे शहर 515/2013 भा.द.वि.कलम 454,457,380
17 कोथरुड जि.पुणे शहर 4204/2014 भा.द.वि.कलम 457,380
18 कोथरुड जि.पुणे शहर 324/2014 भा.द.वि.कलम 457,380
19 कोथरुड जि.पुणे शहर 262/2014 भा.द.वि.कलम 454,457,380
20 कोथरुड जि.पुणे शहर 36/2021 भा.द.वि.कलम 457,380
21 येरवडा जि. पुणे शहर 531/2008 भा.द.वि.कलम 379,411,34
22 येरवडा जि. पुणे शहर 518/2008 भा.द.वि.कलम 379,411,34
23 लोणीकंद जि.पुणे शहर 70/2008 भा.द.वि.कलम 379
24 लोणीकंद जि.पुणे शहर 176/2015 भा.द.वि.कलम 379,34
25 हवेली जि.पुणे शहर 668/2009 भा.द.वि.कलम 379
26 येरवडा जि.पुणे शहर 280/2008 भा.द.वि.कलम 379
27 लोणी काळभोर जि.पुणे शहर 338/2010 भा.द.वि.कलम 379,34
28 हडपसर जि.पुणे शहर 02/2012 भा.द.वि.कलम 379,380,454,457,34
29 बंडगार्डन जि.पुणे शहर 66/2012 भा.द.वि.कलम 381
30 हडपसर जि.पुणे शहर 02/2012 भा.द.वि.कलम 379,380,454,457,34
31 विश्रामबाग जि.पुणे शहर 24/2014 भा.द.वि.कलम 454,457,380
32 विश्रामबाग जि.पुणे शहर 226/2014 भा.द.वि.कलम 454,457,380
33 फरासखाना जि.पुणे शहर 52/2014 भा.द.वि.कलम 454,457,380
34 फरासखाना जि.पुणे शहर 68/2014 भा.द.वि.कलम 454,380
35 भारती विद्यापीठ जि.पुणे शहर 348/2017 भा.द.वि.कलम 454,457,380
36 भारती विद्यापीठ जि.पुणे शहर 646/2016 भा.द.वि.कलम 454,380
37 भारती विद्यापीठ जि.पुणे शहर 522/2018 भा.द.वि.कलम 454,457,380
38 सहकारनगर जि.पुणे शहर 70/2016 भा.द.वि.कलम 454,380
ताब्यातील इसमाला मुद्देमालासह तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना राजुर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015