logo

सहा जणांच्या टोळीला लावला मकोका...

सहा जणांच्या टोळीला लावला 'मकोका'

जळगाव : संघटीत पद्धतीने गुन्हे करणाऱ्या जळगावातील सहा जणांच्या टोळीला मकोका लावण्यास विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात आता हे वाढीव कलम लागून त्यानुसार पुढील तपास होणार आहे. १८ ऑगस्ट २०२५ रोजी

जयकिसनवाडी परिसरात जुन्या वादातून विशाल रमेश बन्सवाल (२६, रा. तांबापुरा) या तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खून करणान्यांवर या पूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याने संघटीत पद्धतीने गुन्हे ते करीत होते. त्यामुळे टोळीप्रमुख आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (२३, रा. तुकारामवाडी), भूषण मनोज अहिरे (२१, रा. विद्यानगर), बबन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर, देव उर्फ दादू विजय पवार (२३, दोघे रा. तुकारामवाडी), आकाश संजय पाटील, (२२, रा. शासकीय निवासस्थान, पीडब्यूडी), अमीन हैदर तडवी (रा. हरिविठ्ठल नगर) या सहा जणांवर मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पाठविला होता. त्यास विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंजुरी दिली.

36
1101 views