
दाभोळे खुर्द बौद्धवाडी शाळेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी
[ दाभोळे | १३ जानेवारी २०२६ ]
✍️ अनिकेत मेस्त्री
➡️संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दाभोळे खुर्द बौद्धवाडी येथे आज दिनांक १२ जानेवारी रोजी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि महान तत्त्वज्ञानी व संन्यासी स्वामी विवेकानंद यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी वेशभूषा,भाषणे आणि मार्ग दर्शनाने हा दिवस प्रेरणादायी बनवला यावेळी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा इयत्ता ५ वीची विद्यार्थिनी समृध्दी राजेंद्र कांबळे हिने साकारली तर स्वामी विवेकानंद यांचे तेजस्वी रूप इयत्ता ५ वीच्याच अंश सुरेंद्र कांबळे या विद्यार्थ्याने साकारले.
याप्रसंगी मुलांना मार्गदर्शन करण्या साठी शाळेचे शिक्षक श्री. संतोष शेडे, श्री. दिपेश कांबळे आणि श्री. जतिन कवडे हे उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ यांचे शौर्य त्याग आणि स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रभक्ती,विचारधारेबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी देखील उत्साहाने या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांबद्दल आपली भाषणे सादर केली. या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि नैतिक मूल्यांची रुजवात झाली.
➖➖➖➖➖➖