logo

पैसे वाटपाच्या संशयावरून उमेदवाराच्या भावाला मारहाण


दोन जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल
जळगाव : पैसे वाटपाच्या संशयांवरून
वाद होऊन प्रभाग क्रमांक २ ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमेदवार उत्तम शिंदे यांचे चुलत भाऊ आनंदा धोंडिबा शिंदे (४५, रा.शिवाजीनगर) यांना दोन जणांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी (१२ जानेवारी) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास काळे नगरात घडली. या प्रकरणी विजय राजू जगताप व सागर राजू जगताप या दोन जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

प्रचार संपण्यास एक दिवस शिल्लक असताना शिवाजीनगर परिसरातील काळेनगरमध्ये प्रचाराच्या वेळी वाद उफाळून आला.

प्रभाग क्रमांक २ ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमेदवार उत्तम शिंदे, पायल दारकुंडे आणि रेखा भगवान सोनवणे हे प्रभागामध्ये कार्यकर्त्यांसोबत प्रचार करीत होते. त्यावेळी उमेदवार उत्तम शिंदे यांचे चुलत भाऊ आनंदा शिंदे हे पैसे वाटप करीत असल्याचा संशय विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांना आला. त्यावरून विजय जगताप, सागर जगताप या दोघांनी आनंदा शिंदे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली, तसेच जीवेठार मारण्याचीही धमकी दिली, अशी फिर्याद आनंदा शिंदे यांनी शहर पोलिसात दिली.

8
636 views