
दभाषी गावाचे सरपंच श्री विकास पाटील यांचा अभिनव उपक्रम....
.....विद्यार्थ्यांची स्वप्नं साकारण्यासाठी 'ड्रीम बॉक्स' संकल्पना...
(विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
शिंदखेडा पंचायत समिती गणातील
दभाशी, वर्षी, कमखेडा, हुंबरडे, वडली, गव्हाणे व शिराळे या गावांमधील जिल्हा परिषद मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व दैनंदिन गरजांची पूर्तता व्हावी, यासाठी 'ड्रीम बॉक्स - स्वप्न पेटी' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या मनात मोठी स्वप्नं असतात. मात्र आर्थिक
परिस्थितीमुळे ही स्वप्नं अनेकदा अपूर्ण राहतात. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा मिळावी व त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थी आपली शैक्षणिक किंवा दैनंदिन गरज एका छोट्या चिठ्ठीत लिहून 'ड्रीम बॉक्स' मध्ये टाकतो. दर महिन्याला या चिठ्यांमधून तीन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्या गरजांची प्रत्यक्ष पूर्तता करण्यात येते.
हा उपक्रम महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार कॅबिनेट मंत्री तथा आमदार
जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गद र्शनाखाली सुरू करण्यात आला असून, ही संकल्पना इन्जि. श्री विकास दिलीप पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष, शिंदखेडा यांनी मांडली आहे.
'ड्रीम बॉक्स' हा उपक्रम केवळ मदतीपुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवि-ष्यासाठीची सामाजिक जबाबदारी असल्याचे आयोजकांनी सांगितले. या उप-क्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत असल्याची भावना पालक व शिक्षकांनी व्यक्त केली आहे.