महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन
महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आज पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा या पथसंचलनाचा मुख्य उद्देश होता.
या पथसंचलनात वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख चौक, संवेदनशील भाग आणि गर्दीच्या ठिकाणी पथसंचलन करून नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
निवडणूक कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिलडा यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे नागरिकांना आवाहन केले.