
अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार
अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार
अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष डॉ परिक्षीत बाविस्कर व उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांचा सह पत्नी सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मा आमदार आबासाहेब डॉ बी एस पाटील होते कार्यक्रमाला किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुरेश दादा पाटील, बन्सीलाल भागवत, प्रविण जैन, मुन्ना शर्मा, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, देखरेख संघाचे माजी चेअरमन प्रताप पाटील, शरद पाटील,अरुण देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिनकर पाटील, महिला जिल्हा अध्यक्ष योजना पाटील, सोनल ताई निकम, जाकिर शेख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र मराठे, चंद्रशेखर भावसार, देवेंद्र देशमुख, विलास पवार, मनोहर निकम, माजी केंद्र प्रमुख गोकुळ पाटील,कढरे गुरुजी ,कृष्णा पाटील, अनिल पाटील जानवे, चिंधू वानखेडे, अनंत निकम, मनोहर पाटील, शांताराम कोळी, वासुदेव पाटील, हरीश लाड विविध संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डी एम पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भटू पाटील , सुभाष पाटील मारवड यांनी परिश्रम घेतले.