
सोसायट्यांतून राष्ट्रवादीला उत्स्फूर्त प्रतिसाद
🔹 पिंपळे गुरव प्रभाग २९ मध्ये नागरिकांचा वाढता विश्वास
सोसायट्यांतून राष्ट्रवादीला उत्स्फूर्त प्रतिसाद
🔹 पिंपळे गुरव प्रभाग २९ मध्ये नागरिकांचा वाढता विश्वास
डोळस कुंदा गौतम, सुनीता दिशांत कोळप, लोखंडे राजू मामा, तानाजी जवळकर यांना जनतेचा कौल
पिंपळे गुरव | प्रतिनिधी उमेश पाटील 8530664576
पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक २९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांच्या प्रचाराला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, परिसरातील सोसायट्या व निवासी संकुलांमध्ये राष्ट्रवादीवरचा विश्वास अधिक दृढ होताना दिसत आहे. पारदर्शक कारभार व सर्वसमावेशक विकासाच्या मुद्द्यावर नागरिक राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याचे चित्र आहे.
पिंपळे गुरव परिसरातील विविध सोसायट्या व गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये डोळस कुंदा गौतम, सुनीता दिशांत कोळप, लोखंडे राजू मामा व तानाजी जवळकर यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. मध्यमवर्गीयांपासून उच्चभ्रू नागरिकांपर्यंत सर्वच स्तरांतून राष्ट्रवादीच्या विचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, चारही उमेदवार उच्चशिक्षित, अभ्यासू व थेट जनसंवाद साधणारे असल्याने नागरिकांच्या समस्या समजून घेण्यावर त्यांचा भर असल्याचे मत रहिवाशांनी व्यक्त केले.
गेल्या तीन दशकांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात झालेला सर्वांगीण विकास, सुसज्ज रस्ते, भक्कम मूलभूत सुविधा व सुरक्षित वातावरण यामुळेच पिंपळे गुरव हा परिसर राहण्यासाठी निवडल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. शांत, सुरक्षित व विकसित उपनगर म्हणून पिंपळे गुरवची ओळख निर्माण झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मात्र, गेल्या दोन पंचवार्षिक महापालिका कार्यकाळात सत्ताधाऱ्यांनी सोसायट्या व निवासी संकुलांकडे दुर्लक्ष केल्याची तीव्र भावना नागरिकांत आहे. अपुरा व अनियमित पाणीपुरवठा, कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन, रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंग, ड्रेनेजमधून ओसंडून वाहणारे सांडपाणी तसेच वारंवार होणारी वाहतूक कोंडी यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर, निवडून आल्यानंतर मूलभूत सुविधांचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा, पारदर्शक व जबाबदार कारभार करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांनी व्यक्त केला आहे. “नागरिकांचा विश्वास हीच आमची खरी ताकद असून, पिंपळे गुरवचा हरवलेला विकासाचा वेग पुन्हा मिळवून देऊ,” असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.